मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : वर्षभरापूर्वी याच दिवशी बदलले पेट्रोल डिझेलचे दर, आजतरी आम आदमीला मिळेल दिलासा?

Petrol Diesel price today : वर्षभरापूर्वी याच दिवशी बदलले पेट्रोल डिझेलचे दर, आजतरी आम आदमीला मिळेल दिलासा?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 22, 2023 08:08 AM IST

Petrol Diesel price today 22 May 2023 : गेल्या वर्षी २२ मे २०२२ रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली होती. वर्षभरात किंमती स्थिर आहेत. त्यामुळे आज पेट्रोल डिझेलच्या दरासंदर्भात आम आदमीला दिलासा मिळेल का, असाच सवाल विचारला जातोय.

petrol pump HT
petrol pump HT

Petrol Diesel price today 22 May 2023 : गेल्या १ वर्षापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजपासून बरोबर १ वर्षाआधी म्हणजेच २२ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (पेट्रोल-डिझेल किंमत) बदलले होते. परंतु त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलत नाहीत. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. २२ मे २०२३ साठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती अपडेट केल्या आहेत.

आजचे दर

२२ मे २०२३ साठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती अपडेट केल्या आहेत. ताज्या किमतींनुसार २२ मे रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट करतात आजच्या किंमतींनुसार, त्यात कोणताही बदल झालेला नाही ही बाब सध्यातरी दिलासादायक म्हणावी लागेल.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग