मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Alan’s Bugles : कोल्ड ड्रिंक्सनंतर आता स्नॅक्सची विक्री, रिलायन्स-जनरल मिल्ससोबत करार

Alan’s Bugles : कोल्ड ड्रिंक्सनंतर आता स्नॅक्सची विक्री, रिलायन्स-जनरल मिल्ससोबत करार

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 28, 2023 11:48 AM IST

Alan’s Bugles : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज एफएमसीजी क्षेत्रातील आपला व्यवसाय झपाट्याने विस्तारत आहे. रिलायन्स कंपनी आता भारतात जनरल मिल्सच्या प्रसिद्ध चिप्स विकणार आहे.

Alan’s Bugles HT
Alan’s Bugles HT

Alan’s Bugles : कोल्ड ड्रिंक इंडस्ट्रीत मोठी गुंतवणूक केल्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीज आंतरराष्ट्रीय स्नॅक्ससह भारतीय बाजारात उतरत आहेत. यासाठी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड (RCPL) ने जनरल मिल्सच्या भागीदारीत एलन्स बगल्स भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. एलन्स बगल्सला यूके, अमेरिका आणि मध्यपूर्वेसह जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. या आंतरराष्ट्रीय कॉर्न चिप्स स्नॅक्स ब्रँडची मालकी जनरल मिल्सकडे आहे.

१० रुपयांपासून सुरुवात

ही श्रेणी 10 रुपयांच्या परवडणाऱ्या पॅकपासून सुरू होईल. दाखलीकरणाप्रसंगी बोलताना, आरसीपीएलचे प्रवक्ते म्हणाले, “आम्ही भारतीय ग्राहकांना प्रीमियम स्नॅकिंग ब्रँडची चव देण्यासाठी एलन्स लाँच केले आहे. चवींवर लक्ष केंद्रित करून वाढत्या स्नॅक्स मार्केटमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचा आमचा मानस आहे. नमकीन, टोमॅटो आणि चीज सारख्या फ्लेवर्सची सुरुवात फक्त १० रुपयांच्या परवडणाऱ्या किमतीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

१९६४ मध्ये बगल्सची सुरुवात

जनरल मिल्स इंडियाचे फायनान्स डायरेक्टर शेषाद्री सावलगी म्हणाले की, जनरल मिल्स जागतिक स्तरावर तिचा सर्वात लोकप्रिय ब्रँड आहे. बगल्स भारतात लाँन्च करण्यासाठी उत्सुक आहोत. हे काॅर्न चिप्स १९६४ मध्ये पहिल्यांदा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत संपूर्ण जगभरात त्याचा विस्तार झाला आहे. चिप्समधील हा लोकप्रिय ब्रँड आहे. त्याचा फायदा घेत आता भारतात दाखल करण्यात येणार आहे.

आरसीपीएल सर्वात आधी केरळमध्ये हे चिप्स दाखल करणार आहेत. त्यानंतर संपूर्ण देशात त्याचा विस्तार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग