मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Android Smartphone : स्मार्टफोनधारकांना धोक्याची सुचना, तुमचा स्मार्टफोन असा होऊ शकतो 'हॅक'

Android Smartphone : स्मार्टफोनधारकांना धोक्याची सुचना, तुमचा स्मार्टफोन असा होऊ शकतो 'हॅक'

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 05, 2022 07:16 PM IST

अँड्राॅईड स्मार्टफोन यूजर्सना अलर्ट होण्याची गरज आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार, लाखो अँड्राॅईड फोन्सचं अस्तित्व धोक्यात आहे.

smartphone HT
smartphone HT

Android Smartphone : अँड्राॅईड स्मार्टफोन यूजर्सना अलर्ट होण्याची गरज आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार, लाखो अँड्राॅईड फोन्सचं अस्तित्व धोक्यात आहे. गुगलच्या एका अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या स्मार्टफोन्समधील त्रुटीचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात.

यात प्रामुख्याने सॅमसंग, एलजी, शाओमी स्मार्टफोन यूजर्सना अलर्ट राहण्याची गरज आहे. या स्मार्टफोनच्या सिक्युरिटी प्रोग्रॅम्सचे डिटेल्स लीक्स झाले आहेत. या फोन्समधील मालवेअर अटॅकचा धोका वाढला आहे. याचा फायदा हॅकर्स उचलू शकतात.

एका रिपोर्टनुसार, हॅकर्स या स्मार्टफोनमधील त्रूटींचा फायदा घेऊन खोट्या मालवेअर्स अॅपला फोन्सच्या टेस्टेड अॅपमध्ये इन्स्टाॅल करु शकतात. त्याद्वारे मोबाईल फोन्स हॅक करता येऊ शकतात. यासंदर्भातील माहिती गुगलच्या एका अभियंत्याने शेअर केली आहे.

गुगलमधील मालवेअर रिव्हर्स इंजिनियरने सांगितले की, नवीन त्रुटीमुळे हॅकर्स त्यांचा खोटा प्रोग्राम स्थापित करून डिव्हाइस सिस्टममध्ये फेरफार करता येतो.यासाठी त्याने गुगल अँड्रॉइड पार्टनर व्हल्नेरेबिलिटी इनिशिएटिव्ह (एपीव्हीआय) च्या अहवालाचा हवाला दिला आहे.

अभियंत्याने सांगितले की, याबाबतचे काही तपशीलही ट्विटरवर शेअर केले आहेत. अहवालात असे म्हटले आहे की,  अनेक अँड्राॅईड ओईएमचे प्लॅटफॉर्म साइनिंगसारखे तपशील लीक झाले आहेत. अँन्ड्राॅईड साइनिंगसाठी, key ऑपरेटिंग सिस्टम महत्त्वाचे असते. स्वाक्षरी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या त्याच अॅपवर ते अवलंबून असते. त्यामुळे अशा प्रकरणात धोका वाढतो.

हीच Key स्मार्टफोन्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. कारण डिव्हाइसवर चालणारी अँड्राॅईड प्रणालीची सत्यता त्यातून पडताळली जाते. वेगवेगळ्या अॅप्समध्ये साइन इन करण्यासाठी समान की वापरली जाते. किंबहुना याच प्रक्रियेच्या माध्यमातून यूजर्सचा संपूर्ण डेटा हॅकर्स चोरु शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग