मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market Tips: निम्म्याहून जास्त घसरले 'या' चार कंपन्यांचे शेअर्स; गुंतवणुकीची संधी

Share Market Tips: निम्म्याहून जास्त घसरले 'या' चार कंपन्यांचे शेअर्स; गुंतवणुकीची संधी

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Oct 04, 2022 05:59 PM IST

Stock Market News: वेलस्पन इंडिया, पिरामल एंटरप्रायझेस, झोमॅटो आणि लक्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे शेअर्स एका वर्षात अर्ध्याहून अधिक घसरले आहेत. पिरामल ६८.७७ टक्के घसरून ८२९.२५ रुपयांवर आला आहे.

market tips strong buying opportunity in these 4 stocks
market tips strong buying opportunity in these 4 stocks

पिरामल एंटरप्रायझेस, वेलस्पन इंडिया, झोमॅटो आणि लक्स इंडस्ट्रीजसारख्या कंपन्यांचे शेअर्स एका वर्षात अर्ध्याहून अधिक घसरले आहेत. पिरामल ६८.७७ टक्क्यांनी २६५५.४० रुपयांवरून ८२९.२५ रुपयांवर घसरला आहे. त्याच वेळी, वेलस्पन इंडिया शेअरची किंमत १६३ रुपयांवरून ७२.९० रुपयांवर आली आहे आणि झोमॅटो शेअरची किंमत १३८ रुपयांवरून ६१.९० रुपयांवर आली आहे. तर  लक्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ५१ टक्क्यांनी घसरून १७८०.७० रुपये आहे.

पिरामलचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३०१४.९५ आहे. त्यात सातत्याने घसरत होत आहे. एकूण ७ पैकी तज्ज्ञांनी या स्टॉकसाठी ‘स्ट्राँग बाय’ सल्ला दिला आहे. गेल्या एका वर्षात वेलस्पन इंडियाचे शेअर्स ५५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १७०.७० आहे आणि निचांकी पातळी ६२.२० रुपये आहे. या साठ्यात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या एका आठवड्यात त्यात किरकोळ वाढ झाली आहे आणि एका महिन्यात १.८८ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर तीन महिन्यांत त्यात सुमारे साडेपाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. ६ पैकी ३ तज्ञांनी या समभागाबद्दल जोरदार खरेदी, २ होल्ड आणि एक विक्री सल्ला दिला आहे.

पिरामलचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३०१४.९५ आहे आणि निचांक ८२६ रुपये आहे. या समभागाचे मूल्य सतत घसरत आहे. त्यात एका आठवड्यात ६.८ टक्के आणि ३ महिन्यांत ५०.४३ टक्के झाला आहे. एकूण 7 पैकी तज्ज्ञांनी या स्टॉकसाठी स्ट्राँग बाय सल्ला दिला आहे.

तर गेल्या एका वर्षात वेलस्पन इंडियाचे शेअर्स ५५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक १७०.७० आहे आणि निचांक ६२.२० रुपये आहे. या ससभागात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या एका आठवड्यात त्यात किरकोळ वाढ झाली. तर एका महिन्यात १.८८ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर तीन महिन्यांत त्यात सुमारे साडेपाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. ६ पैकी ३ तज्ञांनी या समभागाबद्दल जोरदार खरेदी, २ होल्ड आणि एका तज्ज्ञांनी विक्रीचा सल्ला दिला आहे

झोमॅटोच्या शेअर्सनी गेल्या ३ महिन्यांत गुंतवणूकदाराना १० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तथापि, एका वर्षात झोमॅटोने ५५ टक्के गुंतवणूकदार गमावले आहे. या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६९ आहे आणि नीचांक ४०.६० रुपये आहे.

लक्स इंडस्ट्रीजचे शेअर्स गेल्या एका वर्षात ५१ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४६४४ रुपये आणि निचांक १६८४.८५ रुपये आहे. गेल्या तीन महिन्यांत या समभागाने दोन टक्के अधिक परतावा दिला आहे, तर एका आठवड्यात तो सुमारे दोन टक्क्यांनी घसरला आहे. तज्ज्ञ याबाबत उत्साही आहेत आणि मजबूत खरेदीचा सल्ला देत आहेत.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

 

WhatsApp channel

विभाग