मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sukanya Samruddhi : सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर काय? जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Sukanya Samruddhi : सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर काय? जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Oct 09, 2022 01:11 PM IST

Sukanya Samruddhi : मुलींच्या भवितव्यासाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर जैसे ठे ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने या बचत योजनेतील विविधांगी पैलूंचा घेतलेला हा वेध

Sukanya samruddhi Yojana HT
Sukanya samruddhi Yojana HT

Sukanya Samruddhi : सरकारने सर्व लघु बचत योजनांवरील व्याजदरात नुकतीच वाढ केली आहे.मात्र .यातीलच महत्वपूर्ण सूकन्या समृद्धी बचत योजनेचे व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबरल २०२२ च्या तिमाहीसाठी या योजनेचे व्याजदर ७.६ टक्के कायम आहेत.

यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, सर्व लघु बचत योजनांवरील व्याजदरात अंदाजे १० बेसिस पाॅईंट्स ते ३० बेसिस पाॅईंट्सची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आॅक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी लागू राहणार आहे. यानुसार ज्येष्ठ नागरिक बचत यौजनेवरील व्याजदरात २० बेसिस पाॅईट्स वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेवर आता ७.६ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. किसान विकास पत्र योजनेवरील व्याजदरात १० बेसिस पाॅईंट्सची वाढ झाल्यानंतर, ७ टक्के व्याजदर आकारला जाईल. याशिवाय पोस्ट आॅफिस योजनेच्या ३ वर्ष मुदतीसाठी ३० बेसिस पाॅईंट्सची वाढ झाली आहे. त्यामुळे आता हा व्याजदर ५.८ टक्के मिळेल.

काय आहे ही योजना

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या शिक्षण आणि इतर भवितव्यातील तरतूंदीसाठी आर्थिक नियोजन करण्यास पालकांना मदत करते. देशातील मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही लघु बचत योजना आणख्यात आली आहे. यातील नियमांनुसार, तुम्ही खाते उघडल्यानंतर पहिल्या १५ वर्षांसाठी प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा तुमच्या खात्यात पैसे जमा करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा ते खाते डिफाॅल्टर लिस्टमध्ये जाईल. संबंधित पालक किमान २५० रुपये ते कमाल दीड लाखांपर्यंत गुंतवू शकतात.

करलाभ

या खात्यात स्पर्धात्मक व्याजदर, करमुक्त व्याज उत्पन्न, करपात्र परिपक्वता रक्कम आणि ८० सी चे अनेक फायदे मिळतात.

सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजाचे गणित

अर्थ खात्याच्या सुचनेनुसार या खात्यावर वेळोवेळी व्याज दिले जाते. कॅलेंडर महिन्यासाठी व्याजाची गणना पाचव्या दिवसाच्या अखेरीस सर्वात कमी असलेल्या शिलकी रकमेच्या आधारे केली जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाते.

सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी लागणारे दस्तावेज

खाते उघड्यासाठी लागणारा फाॅर्म

लाभार्थ्याचा जन्म दाखला

पालकांचे निवासस्थान

पालकांचे आयडी प्रुफ

लाभार्थी मुलीचे दोन फोटो

रक्कम काढण्याची मुदत

कॅनरा बँकेच्या संकेतस्थळानुसार, “खाते उघडण्याच्या तारखेपासून मुलीचे २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढण्याची परवानगी आहे. तथापि, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात शिल्लक असलेल्या ५०% रक्कम उच्च शिक्षण किंवा लग्नाच्या उद्देशाने काढता येईल.

 

 

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग