मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gram suraksha Yojana : दररोज जमा करा ५० रुपये व एकरकमी मिळवा ३५ लाख रु., ही आहे ग्राम सुरक्षा योजना

Gram suraksha Yojana : दररोज जमा करा ५० रुपये व एकरकमी मिळवा ३५ लाख रु., ही आहे ग्राम सुरक्षा योजना

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 26, 2023 08:25 AM IST

Gram suraksha Yojana : जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.पोस्ट आँफिसमधील अशाच ग्राम सुरक्षा योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Post office saving schemes HT
Post office saving schemes HT

Gram suraksha Yojana : जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण पोस्ट आँफिसमधील गुंतवणूक योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. पोस्ट ऑफिसमधील अनेक योजना सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या आणि अधिकाधिक परतावा देणाऱ्या आहेत.

पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या या योजनांपैकी एक योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना. या योजनेत तुम्ही दररोज ५० रुपये जमा केल्यास, तुम्हाला पुन्हा ३५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते, चला तर मग या योजनेची सर्व माहिती जाणून घेऊया.

ग्राम सुरक्षा योजना

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त ३५ लाख रुपयांपर्यंत पूर्ण लाभ मिळू शकतो. या योजनेत गुंतवलेली रक्कम गुंतवणूकदारांना वयाच्या ८० व्या वर्षी बोनससह उपलब्ध होते. संबंधित गुंतवणूकदाराचे वयाच्या ८० वर्षाआधीच निधन झाले तर ती रक्कम नॉमिनीला मिळते. तुमचे वय १९ ते ५५ वर्षे दरम्यान असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली जाऊ शकते. तुम्ही त्याचा हप्ता १ महिना, ३ महिने, ६ महिने किंवा वार्षिक आधारावर भरू शकता.

बोनसही मिळण्याची सोय

जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत गुंतवणूक केली तर त्याला ४ र्षांनंतर बोनसची सुविधा मिळते. एखाद्या पाॅलिसीधारकाला जर ही पाॅलिसी सरेंडर करायची असेल तर तो पाॅलिसीच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर करु शकतो. या योजनेत ५ वर्षांनी गुंतवणूक केल्यानंतर बोनसही मिळतो.

रक्कम किती मिळेल

जर एखाद्याने जर त्याने या योजनेत महिन्याला १५०० रुपये जमा केले, म्हणजेच जर त्याने दररोज फक्त ५० रुपये जमा केले तर त्याला योजनेच्या मॅच्युरिटीवर ३५ लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.

पूर्ण रक्कम कधी मिळेल

गुंतवणूकदाराला ५५ वर्षांच्या मुदतीच्या मॅच्युरिटीवर ३१ लाख ६० हजार रुपये, ५८ वर्षांच्या मॅच्युरिटीवर ३३ लाख ४० हजार रुपये आणि ६० वर्षांत ३४.६० लाख रुपये मिळतील. या योजनेंतर्गत, वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्यावर पूर्ण रक्कम संबंधित गुंतवणूकदाराला अथवा त्याच्या नाॅमिनीला सुपूर्द केली जाते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या