मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Meta Layoff : 'अचानक मेटाने दिले ले ऑफ लेटर' , मातृत्त्वाच्या रजेवर असलेल्या महिलेची भावूक पोस्ट

Meta Layoff : 'अचानक मेटाने दिले ले ऑफ लेटर' , मातृत्त्वाच्या रजेवर असलेल्या महिलेची भावूक पोस्ट

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 11, 2022 10:59 AM IST

Meta Layoff : तीन महिन्यांपूर्वीच मातृत्त्वाच्या रजेवर असलेल्या मेटातील महिला कर्मचारीला ले आँफ लेटरचा ईमेल पाहून धक्का बसला. तिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.काय लिहिलयं, त्यात वाचा -

Aneka Patel and her 3 months old daughter
Aneka Patel and her 3 months old daughter

Meta Layoff : फेसबूकची पालक कंपनी मेटाने नुकतेच ११ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे अनेकांपुढे अर्थार्जनाची नवी समस्या उभी राहिली आहे. फेसबूकमध्ये काम करणाऱ्या एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. ही महिला या कर्मचारी कपातीच्या तीन महिने आधी मातृत्त्वाच्या सुट्टीवर होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये ती कामावर रुजू होणार होती. एनेका पटेल असं या महिलेचे नाव असून तिला अचानक आलेल्या ले आँफ लेटरच्या ईमेलने चांगलाच धक्का बसला आहे. तिने आपली भावूक पोस्ट इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

एनेका पटेल म्हणते की. मी पहाटे ३ वाजता बाळाच्या आवाजाने उठले. स्तनपान करत असताना, मोबाईलमध्ये मी ईमेल चेक करत होते. मेटामध्ये झालेल्या ११००० कर्मचारी कपातीसंदर्भात मला माहित होते. त्यामुळे मी आँफिस ईमेल चेक केला. तेंव्हा माझाही या कर्मचारी कपातीमध्ये सहभाग असल्याचे पाहून मी धक्का बसला आहे. प्रत्येक स्त्रीसाठी मातृत्त्वाचा काळ हा कठीण आणि नाजूक असतो. अनेक प्रकारच्या आव्हानांना या काळात नव्याने सामोरं जावं लागत असतं. या ले आँफ लेटरमुळे त्यात आता आणखी भर पडली आहे. माझी मुलगी आता तीन महिन्यांची आहे. सध्यातरी आता मी पुढचे तीन महिने तिच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानंतर नवीन नोकरीचा शोध घेणार असले तरी सध्या माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे.

एनेका प्रमाणेच हिमांशू नावाच्या कर्मचाऱ्यानेही आपली व्यथा मांडली आहे. त्याने नुकतेच मेटा जाँईन केले होते. हिमांशू याने दोन दिवसांपूर्वीच मेटा जाँईन केले होते. कॅनेडा येथे जाऊन तिथल्या आँफिसमध्ये काम करायला सुरुवात केली होती. पण अचानक ले आँफ लेटरमुळे तो व्यतीथ झाला आहे. मी आता पुढे काय करु ? माझ्यापुढे आता तरी करण्यासारखे काहीच नाही. जर कुणाला भारत किंवा कॅनडामध्ये साँफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी माहित असेल तर प्लीज कृपया मला सांगा, अशी भावनिक विनंतीची साद त्याने नेटिजन्सना घातली आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग