मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Fixed deposit : मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा हाच सुवर्णकाळ, हा आहे योग्य पर्याय

Fixed deposit : मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा हाच सुवर्णकाळ, हा आहे योग्य पर्याय

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 14, 2023 12:12 PM IST

Fixed deposit : रेपो दरात वाढ झाल्याने मुदत ठेवींवर गुंतवणूक करण्यासाठी अनेकजण इच्छुक असतील. यामुळे बाजारात फ्री फ्लोटिंग मनीची कमरतरता निर्माण होईल.

fixed deposits HT
fixed deposits HT

Fixed deposit : रिझर्व्ह बँकेने आपल्या तिमाही पतधोरणात गेल्या ९ महिन्यांच्या कालावधीमध्ये रेपो दरात २.५० टक्के वाढ केली आहे. ही बाब मुदत ठेव (एफडी) गुंतवणूकदारांच्या अनुषंगाने एक चांगली बातमी आहे. यामुळे मुदत ठेव अधिक आकर्षित होईल आणि निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करेल. यामुळे अधिकाधिक लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक होतील. यामुळे बाजारात फ्रि फ्लोटिंग मनीची कमतरता निर्माण होईल. तज्ज्ञांच्या मते, निश्चित उत्पन्न योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे. गुंतवणूक कमी कालावधीच्या मध्यम आणि दीर्घ कालावधीच्या श्रेणीमध्ये गुंतवणूक करु शकतात.

सहावेळा रेपो दरात झाली वाढ

६.५ टक्के (०.२५ बेसिस वाढ) - ८ फेब्रुवारी २०२३

६.२५ टक्के (०.३५ बेसिस वाढ) - ७ डिसेंबर २०२२

५.९० टक्के (०.५० बेसिस वाढ) - ३० सप्टेंबर २०२२

५.४० टक्के (०.५० बेसिस वाढ) - ५ आँगस्ट २०२२

४.९० टक्के (०.५० बेसिस वाढ) - ८ जून २०२२

४.४० टक्के (०.४० बेसिस ) - ४ मे २०२२

४ टक्के ९ आँक्टोबर २०२०

हे आहे ईएमआयचे गणित

तुमच्या मासिक हप्त्यावर पडेल फरक - मासिक हप्त्यातील वाढ ही प्रामुख्याने गृहकर्जाच्या बाकी कालावधीवर अवलंबून असेल. जर तुमच्याकडे कालावधी जास्त असेल तर व्याजाची रक्कम वाढवण्याचा अधिक चांगला परिणाम होईल.

उदाहरण १ ले ः २० वर्षांच्या कालावधीसाठी३० लाख रुपये होम लोनव र एक वर्षासाठी व्याद सात टक्के वाढून ९.२५ टक्के झाला आहे. त्यासाठी कालावधीत बदल न केल्यास २३,२५८रुपये वाढून आता २७,३८७ रुपये झाली आहे.

उदाहण २ रे ः रेपो दरवाढीनंतर २० वर्षांसाठी ५० लाख रुपये गृहकर्जावर व्याज दर ९ टक्क्यांनी वाढून ९.२५ टक्के झाल्यानंतर तुमच्या ४५७९३ रुपये मासिक हप्त्यामध्ये ८०७ रुपयांची वाढ होईल. जर तुम्ही हप्ता वाढवला तर तुमच्या कर्जाचा कालावधी १४ महिने वाढेल.

कर्जदारांसमोरील पर्याय

- वर्षांतून एक वेळ हप्ता ५ टक्क्यांनी वाढवा.यामुळे तुमचा कालावधी कमी होईल

- जर दरात वाढ झाल्याने कर्जाचा कालावधी २० वरुन २५ वर्ष केला असेल तर १० वर्षांसाठी ईएमआयमध्ये बदलासह १० टक्के कर्जाची परतफेड आधीच करा.

- फ्लोटिंग व्याजदराचा पर्याय निवडा

- कर्जाची पूर्व परतफेड करण्याचा प्रयत्न करावा.

- तुमच्या बचतीसंदर्भात आर्थिक शिस्त लावून घ्या.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग