SIP investment : पै-पै बचतीचा खजिना आहे ही एसआयपी, तुमच्या आयुष्यातील तिचे महत्त्व ओळखा, अशी करा गुंतवणूक
SIP investment : पैसा कमावणे आणि संपत्ती जमवणे यांच्यात एक पुसटशी रेष आहे. त्यातील फरक ओळखण्यासाठी एसआयपीतील गुंतवणूक योग्य मार्गदर्शक ठरु शकते. तुम्हीही ओळखा तुमच्या आयुष्यातील एसआयपीचे महत्त्व.
SIP investment : आयुष्यातील कष्टार्जित मिळकत जेंव्हा आपण पै पै करुन जमवतो ती तुमची संपत्ती बनते. त्यामुळेच ही बचतीची सवयच श्रीमंत होण्याचा खरा मार्ग दाखवते. पण केवळ पैशाची बचत करुन संपत्ती उभी राहत नाही. तर जमा केलेली बचत ही योग्य मार्गी गुंतवली की त्याचा फायदा होतो. आजकालच्या जमान्यात एसआयपी गुंतवणूकीत ही काही हजारांचे कोट्यवधी करण्याची क्षमता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
हजाराचे कोट्यवधी करण्याची क्षमता
समजा एखाद्या व्यक्तीने प्रती महिना ५ हजार रुपयांची गुंतवणूक एसआयपीमध्ये केली तर २५ वर्षात सरासरी १३ टक्क्यांनी त्याला कोट्यवधींचा परतावा सहज मिळू शकतो. पण अनेकदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची योग्य समज नसते. अशावेळी इंडेक्स फंडातून निफ्टी ५० मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. देशातील टॉप-५० कंपन्यांचा हा पोर्टफोलिओ आहे. या अतिशय कमी किमतीच्या फंडाने गेल्या ५ वर्षात वार्षिक सरासरी १८.२ टक्क्यांनी परतावा दिला आहे.
ईएलएसएसमध्ये गुंतवणूक
तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत ४६,८०० रुपयांपर्यंतची वजावट देखील मिळवू शकतात. तुम्हाला एका आर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते.
नकारात्मक परताव्यापासून सावध रहा
कोणतीही गुंतवणूकीची टक्केवारी ही प्रामुख्याने महागाई दरावर अवलंबून असते. त्यामुळे नकारात्मक परतावा टाळण्यासाठी एखाद्याला वार्षिक ६ टक्के परतावा मिळेल अशाच ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. किंबहुना एसआयपीतून जमा झालेली रक्कम तुमच्या केवळ गरजेप्रमाणेच काढा. बाजारातील अस्थिरतेला घाबरुन जाऊन गुंतवणूक काढून घेऊ नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
संबंधित बातम्या
विभाग