Bank Holidays in June : जून महिन्यात इतके दिवस बँका राहतील बंद, यादी पाहा आणि बँकांतील कामांचे आत्ताच नियोजन करा
Bank Holidays in June : जून महिन्यात तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर जाणून घ्या बँकेत किती दिवस सुट्टी असेल.
Bank Holidays in June : बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खात्यातून पैसे काढण्यापासून ते ड्राफ्ट काढण्यापर्यंत सर्व कामांसाठी बँकेत जावे लागते. यासोबतच आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बदलण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
अशा परिस्थितीत, जर तुम्ही जून महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जात असाल तर लक्षात ठेवा की जून महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या आहेत. त्यामुळे जून महिन्यातील ही बँक हाॅलिडेजची लिस्ट पाहूनच कामाचे नियोजन करा. जेणेकरुन तुमचा त्रास वाचेल.
रिझर्व्ह बँक जाहीर करते सुट्ट्यांची यादी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या सोयीसाठी दर महिन्याला बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. या यादीमध्ये प्रत्येक राज्यातील सण आणि जयंतीनुसार सुट्ट्या ठरवल्या जातात. जून महिन्यात शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये रथयात्रा, खर्ची पूजा आणि ईद उल अजहामुळे बँका बंद राहतील. जून २०२३ मध्ये बँकांमध्ये एकूण १२ दिवस सुट्टी असेल. इथे यादी पाहा.
जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या
४ जून २०२३ - रविवारी देशभरात बँका बंद राहतील
१० जून २०२३ - दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल
११ जून २०२३ - रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी
१५ जून २०२३ - मिझोराम आणि ओडिशामध्ये राजा संक्रांतीनिमित्त बँका बंद राहतील
१८ जून २०२३ - रविवारी बँका बंद राहतील
२० जून २०२३ - ओडिशात रथयात्रेमुळे बँका बंद राहतील
२४ जून २०२३ - चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील
२५ जून २०२३- रविवारी देशभरात बँका बंद राहतील
२६ जून २०२३- त्रिपुरामध्ये खर्ची पूजेमुळे बँका बंद राहतील
२८ जून २०२३ - केरळ, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये ईद उल अजहानिमित्त बँका बंद राहतील
२९ जून २०२३ - ईद उल अजहा निमित्त इतर राज्यांमध्ये बँका बंद राहतील
३० जून २०२३- मिझोराम, ओडिशामध्ये रीमा ईद उल अझामुळे बँका बंद राहतील
संबंधित बातम्या