मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank Holidays in May : मे महिन्यात ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद, पटापट करा तुमच्या कामाचे नियोजन

Bank Holidays in May : मे महिन्यात ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद, पटापट करा तुमच्या कामाचे नियोजन

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 26, 2023 06:27 PM IST

Bank Holidays in May : मे महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे पुढील महिन्यातील बँकांशी संबंधित कामांचे नियोजन करण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत.

bank holidays in May HT
bank holidays in May HT

Bank Holidays in May : प्रत्येक महिन्यातील बँकांच्या सुट्टीच्या कॅलेंडरप्रमाणे मे महिन्यातील कॅलेंडरही नुकतेच रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. या कॅलेंडरनुसार मे महिन्यात सुट्ट्यांची रेलचेल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण तब्बल ११ दिवस बँकांमध्ये व्यवहार होणार नाहीत.

मे महिन्याची सुरुवातच सुट्टीने होते. १ मे रोजी महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिन असल्याने व्यवहार होणार नाहीत. तत्पुर्वी चौथा शनिवार रविवार येत असल्याने एप्रिल महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि मे महिन्यातील पहिला दिवस असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

त्याशिवाय ५ मे रोजी बुद्धपौर्णिमा, ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांची जयंती, १६ मे रोजी सिक्कीम स्थापना दिवस आणि २२ मे रोजी महाराणा प्रताप जयंती आहे. त्याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार रविवार मिळून १४ दिवस बँका बंद राहणार आहेत.

पूर्ण भारतात एकाच दिवशी सगळ्याच बँका बंद राहतील असे नाही. काही भागात सुट्टी असली तरी इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु राहिल. त्यामळे बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घेता येतील.

सुट्टीनुसार कोणत्या राज्यात बँका बंद राहतील ते पाहुया

१ मे, सोमवार - कामगार दिन - बँका कर्नाटक, महाराष्ट्र, तामीळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, केरळ, बंगाल, गोवा आणि बिहारमध्ये बंद

५ मे, शुक्रवार - बुद्धपौर्णिमा -त्रिपुरा, मिझोरम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश

९ मे मंगळवार- रविंद्रनाथ टागोर जयंती - बंगाल

१६ मे, मंगळवार - सिक्कीम दिवस - सिक्कीम

२२ मे, सोमवार - महाराणा प्रताप जयंती - हिमाचल प्रदेश

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग