मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Patanjali shares down : पातंजलीचे शेअर्स गडगडल्यावर बाबा रामदेव काय म्हणाले ? जाणून घ्या

Patanjali shares down : पातंजलीचे शेअर्स गडगडल्यावर बाबा रामदेव काय म्हणाले ? जाणून घ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 13, 2022 10:49 AM IST

Patanjali shares down : पतंजली फूड्सचा गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत ५,९९५.०३ कोटीचा महसूल होता. या वर्षीच्या याच तिमाहीत ४२.०२% वाढून ८,५१४.१२ कोटी झाला आहे.

Patanjali foods HT
Patanjali foods HT

Patanjali shares down : योगगुरू रामदेव यांची शेअर बाजारात सूचीबद्ध कंपनी पातंजली फूड्सने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३२ टक्क्यांनी घट झाली आहे. पतंजली फूड्सने या तिमाहीत ११२.२८ कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे. जो मागील वर्षीच्या याच कालावधीत १६४.२७ कोटी होता.

महसुलाची स्थिती : गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत पातंजली फूड्सचा महसूल ५,९९५.०३ कोटी होता, जो या वर्षी याच तिमाहीत ४२.०२% ने वाढून ८५१४.१२ कोटी झाला. पातंजलीच्या खाद्य व्यवसायाने सप्टेंबर तिमाहीत २,३९९.६६ कोटी रुपयांची विक्री नोंदवली.

नफ्यात घट होण्याची कारणे: पातंजली फूड्सला सप्टेंबरच्या तिमाहीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या ३ महिन्यांत विविध खाद्यतेलांच्या जागतिक किमतीतील अस्थिरतेमुळे खाद्यतेल उद्योगावर मार्जिनचा दबाव दिसून आला. या काळात किरकोळ किमतींवरही दबाव आला. पातंजलीच्या मते तेल आणि तेलबियांवरील स्टॉक मर्यादा सुरू ठेवणे, किरकोळ खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यावर सरकारचा भर आणि महागाईचाही परिणाम दिसून येत आहे. 

शेअर विक्रीचा दबाव : गुरुवारनंतर पातंजली फूड्सच्या शेअरमध्ये विक्रीचे वातावरण होते. कंपनीच्या शेअरची किंमत १२६७.९५ रुपयांपर्यंत घसरली.  त्यात १.९१% ची घसरण झाली। कंपनीचे बाजारभांडवल मूल्य ४५,८९९.१४ कोटी रुपये आहे.

याआधी गुरुवारच्या  शेअरची किंमत १२९२.६५ रुपये प्रति शेअर्स होती.  यात ४.१५% ची घसरण झाली. कंपनीचे बाजार भांडवली मूल्य ४६,७९३.२६ कोटी रुपये होते. याचाच अर्थ बाजार भांडवलात अवघ्या एका ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास १ हजार कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

या तिमाही निकालासंदर्भात बाबा रामदेव म्हणाले की, या तिमाहीत खाद्यतेल उद्योगावर मार्जिनवर दबाव दिसून आला. कारण विविध खाद्यतेलाच्या जागतिक किमतीतील अस्थिरतेमुळे या ३ महिन्यांत सुमारे 400-500 डाॅलर्स प्रति टनपर्यंत किंमतीत घट झाली. भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेपैकी ६०% पेक्षा जास्त आयात करतो. त्यामुळे किरकोळ किमतींवर जागतिक बाजारपेठेचा दबाव दिसून आल्याने नफ्यावर परिणाम झाला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग