मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO this week : चालू आठवड्यात येणार ४ नवे आयपीओ, पैसे तयार ठेवा!

IPO this week : चालू आठवड्यात येणार ४ नवे आयपीओ, पैसे तयार ठेवा!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 07, 2022 03:34 PM IST

IPO: आर्चेन केमिकल इंडस्ट्रीज लि., फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स लि., केनेस टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​IPO पुढील आठवड्यात उघडत आहेत. अधिक जाणून घ्या -

IPO HT
IPO HT

IPO this week :  गेल्या आठवड्यात तुम्ही कंपन्यांच्या आयपीओत गुंतवणूक करण्याची संधी हुकली, तर काळजी करण्याची गरज नाही.  चालू आठवड्यात पुन्हा एकदा आयपीओ (IPO) च्या माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. 

आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेड, केनेस टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांचे आयपीओ आजापासून सुरु होणाऱ्या आठवड्यात येत आहेत. या सर्व कंपन्या आयपीओच्या माध्यमातून ५०२० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

कोणत्या कंपनीचा IPO कधी उघडेल?

१-  आर्चियन केमिकल्स (Archean Chemical) - हा  आयपीओ ९ नोव्हेंबर रोजी उघडेल आणि ११ नोव्हेंबर २०२२ रोजी बंद होईल. कंपनीने आयपीओसाठी ३८६-४०७ रुपये किंमत बँड निश्चित केला आहे. आर्चियन केमिकल्सचे आयपीओद्वारे १,४६२.३ कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट आहे. यातील ८०५ कोटी रुपये ताज्या इश्यूद्वारे असतील.

२- फाइव्ह स्टार बिझनेस -  हा आयपीओ देखील ९ नोव्हेंबर रोजी उघडेल आणि ११ नोव्हेंबर रोजी बंद होईल. छोट्या उद्योगांना कर्ज देणाऱ्या या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून १९६० रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने आयपीओसाठी किंमत ४५०-४७४ रुपये निश्चित केली आहे.

३ - केन्स टेक्नॉलॉजी - हा आयपीओ १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. कंपनीच्या आयपीओची किंमत ५५९-५८७ रुपये निश्चित करण्यात आली आहे. केन्स टेक्नॉलॉजी या आयपीओद्वारे ८५७.८ कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.

४- आयनॉक्स एनर्जी  -  हा आयपीओ ११ नोव्हेंबर २०२२ ते १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत खुला असेल. ७४० कोटी रुपयांच्या या आयपीओसाठी कंपनीने अद्याप किंमत ठरवलेली नाही. एक-दोन दिवसांत प्राइस बँड जाहीर होईल,असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. 

२०२१ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी आयपीओत घट

२०२१ च्या तुलनेत हे वर्ष २०२२ च्या दृष्टीने अतिशय शांततेचे गेले आहे. पहिल्या तीन महिन्यांत केवळ तीन कंपन्यांचे आयपीओ होते. मात्र मार्चनंतर १९ कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले. या वर्षी आतापर्यंत कंपन्यांनी आयपीओद्वारे ४४,०८५ कोटी रुपये उभे केले आहेत. तर २०२१ मध्ये ६३ कंपन्यांनी आयपीओद्वारे १.१९ लाख कोटी रुपये उभे केले होते. रशिया-युक्रेन युद्ध आणि वाढत्या महागाईने कंपन्यांना त्यांच्या योजनांपासून मागे हटण्यास भाग पाडले आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग