Adani Hidenberg : अदानी समुहाने शेअर्समध्ये फेरफार केली नाही,SC समितीने दिली क्लीन चीट, शेअर्स वाढले
Adani hidenberg : अदानी समुहाच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. समुहातील फ्लॅगशीप कंपनी अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअर्समध्ये ३ टक्के वाढ झाली आहे. अदानी पोर्ट्स, अदानी पावर, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये रिकव्हरी झाली आहे.
Adani hidenberg : अदानी समुहासाठी एक चांगली बातमी, सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने अदानी समुहाला क्लीन चीट दिली आहे. ही समिती अदानी समुहावर हिडनबर्गच्या अहवालावर लावण्यात येणाऱ्या आरोपांची शहानिशा करत आहे. सेबीकडून नियमांचे कोणत्याही प्रकारचेे उल्लंघन झाले नसल्याचेही समितीने सुचित केले आहे. समितीने सर्वोच्च न्यायावयात सादर केलेल्या अहवालाता अदानी समुहाने शेअर्समध्ये कोणत्याही प्रकारची फेरफार केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. अदानी समुहाने रिटेल गुंतवणूकदारांच्या हितासाठीच जरुरी पावले उचलली असल्याचे सांगितले.
ट्रेंडिंग न्यूज
शेअर्समध्ये कोणताही खास पॅटर्न नाही
पॅनलनुसार सेबीने जारी केलेल्या शेअर्स पॅटर्ननुसार, अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये फारसा बदल दिसत नाहीये. हिडेनरबर्गच्या आरोपांमध्ये अदानी समुहाने शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचे स्पष्ट केले होते. समितीच्या या निर्णयानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली.
सेबी करतेय १३ व्यवहारांची चौकशी
यापूर्वी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सेबीने आपला युक्तिवाद ठेवला होता. सेबीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. यात सेबीने सांगितले की, ज्या १३ सौद्यांची चौकशी करण्याची प्रक्रिया जटिल आहे. कारण त्यात अनेक उप व्यवहारांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक देशी विदेशी बँका आणि ऑन-शोअर आणि ऑफ-शोअर संस्थांचे आर्थिक व्यवहार तपासावे लागतील. सेबीच्या या मागणीला अनुसरुन सर्वोच्च न्यायालयाने १४ आॅगस्टपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश सेबीला दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
शेअर्स वधारले
या निर्णयानंतर अदानी एन्टरप्राईजेससह अदानी समुहातील शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. अदानी एन्टरप्राईजेसचा शेअर्स ३ टक्क्यांनी वधारला आहे.
यापूर्वी १७ मे रोजी झाली सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी अदानी समूह आणि हिंडेनबर्ग प्रकरणावर सुनावणी करताना निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने सेबीला या प्रकरणाचा तपास १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सेबीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे ६ महिन्यांचा वेळ मागितला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंतच मुदत दिली असून आता सेबीला १४ ऑगस्टपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करायचा आहे.
सेबीने तपासासाठी मागितली मुदतवाढ
यापूर्वी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सेबीने आपला युक्तिवाद ठेवला होता. सेबीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. यात सेबीने सांगितले की, ज्या १२ सौद्यांची चौकशी करण्याची प्रक्रिया जटिल आहे. कारण त्यात अनेक उप व्यवहारांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक देशी विदेशी बँका आणि ऑन-शोअर आणि ऑफ-शोअर संस्थांचे आर्थिक व्यवहार तपासावे लागतील. सेबीच्या या मागणीला अनुसरुन सर्वोच्च न्यायालयाने १४ आॅगस्टपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश सेबीला दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
शेअर्स वधारले
या निर्णयानंतर अदानी एन्टरप्राईजेससह अदानी समुहातील शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. अदानी एन्टरप्राईजेसचा शेअर्स ३ टक्क्यांनी वधारला आहे.
संबंधित बातम्या