मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC - Adani : अदानी वादाचा एलआयसीला मोठा फटका! तब्बल ५० हजार कोटींचं नुकसान

LIC - Adani : अदानी वादाचा एलआयसीला मोठा फटका! तब्बल ५० हजार कोटींचं नुकसान

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 24, 2023 09:06 AM IST

LIC - Adani : अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक आहे. त्यात प्रामुख्याने अदानी एन्टरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट आणि एसीसी आहे.

LIC Adani HT
LIC Adani HT

LIC - Adani : हिडेनबर्गच्या अहवालानंतर संकटात अडकलेल्या अदानी समूहाच्या या वादाचा फटका देशांतर्गत गुंतवणूक संस्था भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ला चांगलाच बसला आहे. एलआयसीला अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकक केल्यामुळे अंदाजे ४९,७२८ कोटींचा फटका बसला आहे. अदानी समूहातील लिस्टेड कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक आहे. यात प्रामुख्याने अदानी एन्टरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट आणि एसीसी आहे.

बिझनेस टूडेच्या अहवालानुसार, ३१ डिसेंबर २०२२ ला अदानी समूहातील या कंपन्यांमधील गुंतवणूक अंदाजे ८२,९७० कोटी रुपये होती. जी आता केवळ ३३,२४२ कोटी रुपये राहिली आहे. हा अंदाज ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अदानी शेअर्सच्या बाजारमूल्य आणि त्यांचे सध्याचे बाजारमूल्य यांच्यातील फरकावर आधारलेला आहे.

याआधी ३० जानेवारीला एलआयसीने शेअर बाजाराला सांगितले की, अदानी समूहातील कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी २७ जानेवारीला ५६,१४२ कोटी रुपये होता. तर इक्विटीचे खरेदी मूल्य ३०,१२७ कोटी रुपये होते. एलआयसीचे एकूण इक्विटी मूल्य (एएमयू) ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत १०.९१ लाख कोटी रुपये होती.

२४ जानेवारी २०२३ ला हिडेनबर्गने अदानी समूहावर शेअर हेराफेरीसह अनेक गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर अदानी समूहातील १० कंपन्यांमधील शेअर्समध्ये घसरण थांबतच नाहीये..

कोणत्या शेअर्सची अशी आहे स्थिती

या कालावधीत अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सच्या किमतीत ७१.८ टक्क्यांची घट झाली. तर गेल्या एक महिन्याच्या कालावधीत अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये २३.३० टक्क्यांची घट झाली आहे. अदानी विल्मरच्या शेअरची किंमत ३९०.३० रुपये होती. गेल्या एका महिन्यात हा शेअर्स २८.३० टक्क्यांनी कोसळला आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर्सही गेल्या एका महिन्यात जवळपास २९.२० टक्क्यांनी घसरला आहे. एनडीटीव्हीचा शेअर्स २८.९० टक्क्यांनी घसरला आहे. तर अदानी पावर ४०.८० टक्क्यांनी कोसळला. या मोठ्या फरकांच्या शेअऱ घसरणीचा फटका सर्वसामान्य गुंतवणूकदारांना चांगलाच बसला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या