Vastu Tips : घरच्या व्हरांड्यात टांगा या वस्तू, कौटुंबिक कलह होईल दूर
Vastu Tips For Home : घरात कलह होत असेल तर घरच्या व्हरांड्यात कोणत्या वस्तू लावाव्यात, याबदादल काय सांगतं वास्तुशास्त्र.
ज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. हे दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. ज्योतिषशास्त्र तारे आणि ग्रह यांच्याशी संबंधित आहेत. ग्रह, नक्षत्र, राशी याचा तुमच्या कामाच्या ठिकाणावर आणि राहाणीमानावर खूप प्रभाव पडतो. म्हणूनच कामचं ठिकाण असो किंवा घर इथं वास्तुशास्त्र अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतं.
ट्रेंडिंग न्यूज
आज आपण वास्तुच्या काही सोप्या आणि छोट्या छोट्या टिप्स पाहाणार आहोत.
१. घराच्या पूर्वेला मोठी खिडकी असावी असं वास्तुशास्त्र सांगतं. मोठी खिडकी खूप सूर्यप्रकाश घरात आणते.
२. इशान्य दिशेला कधीही देवघर ठेवू नये. कारण इशान्य दिशेचा स्वामी गुरू आहे.
३. उत्तर पश्चिम कोपऱ्यात अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. चंद् हा उत्तर पश्चिम दिशेचा स्वामी म्हणून ओळखला जातो.
४. कौटुंबिक कलह होत असतील तर विंड चाईम घराच्या व्हरांड्यात लावा आणि त्या खोलीत क्रिस्टल ठेवा.
५. घरात बंद घड्याळ ठेवू नका. याचा कुटुंबातल्या इतर व्यक्तींवर नकारात्मक परिणाम पडतो.
६. स्वयंपाकघर दक्षिणेला असावं कारण, दक्षिणेचा स्वामी अग्नी आहे. स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावं.
७. घराच्या मुख्य गेटजवळ पायऱ्या ठेवू नयेत. इशान्य दिशा केतूशी संबंधित आहे. यामुळे नशीब तुमच्यावर रुसतं.
८. घराचा मुख्य दरवाजा उत्तर आणि पूर्व अशा कोणत्याही दिशेला बनवता येतो. मात्र मुख्य गेटजवळ शू रॅक नसावा. असं असल्यास नकारात्मक उर्जा आकर्षित होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या