मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips : झाडू ठेवण्याची दिशा कोणती असावी?, काय सांगतं वास्तुशास्त्र?

Vastu Tips : झाडू ठेवण्याची दिशा कोणती असावी?, काय सांगतं वास्तुशास्त्र?

May 30, 2023 12:50 PM IST

Vastu Shastra About Broom : ज्या घरात पवित्र आणि शुद्ध वातावरण असेल त्या घरी जाणं लक्ष्मी माता पसंत करते. घर स्वच्छ ठेवायचं असेल तर झाडून घ्यावं लागतं. त्यामुळेच घरातल्या झाडूलाही महत्व प्राप्त झालं आहे.

झाडू ठेवण्याची दिशा कोणती असावी
झाडू ठेवण्याची दिशा कोणती असावी (HT)

सनातन धर्मात माता लक्ष्मीला अनन्य साधारण महत्व आहे. माता लक्ष्मी ज्यावर प्रसन्न होते त्यावर धनलवर्षाव होतो, त्या व्यक्तीला कसलीही कमतरता राहात नाही. मात्र ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी रुष्ट होते त्याव्यक्तीला रंक बनवून जाते. माता लक्ष्मीला साफसफाई किंवा टापटिप असलेली घरं प्रिय असतात आणि माता लक्ष्मीला अस्वच्छ घरं आवडत नाहीत.

ज्या घरात पवित्र आणि शुद्ध वातावरण असेल त्या घरी जाणं लक्ष्मी माता पसंत करते. घर स्वच्छ ठेवायचं असेल तर झाडून घ्यावं लागतं. त्यामुळेच घरातल्या झाडूलाही महत्व प्राप्त झालं आहे.

आज आपण पाहाणार आहोत झाडूशी संबंधीत काही गोष्टी ज्या केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते.

झाडूशी संबंधीत कोणत्या गोष्टी करू नयेत.

वास्तुशास्त्रातही झाडूला खूप खास स्थान दिलं गेलं आहे आणि याच्याशी संबंधित काही नियम देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार झाडू नेहमी घरात योग्य दिशेला ठेवली गेली असावी. झाडू चुकूनही ईशान्य दिशेला ठेवू नये. ही दिशा देवी-देवतांची दिशा मानली जाते.अशावेळी येथे झाडू ठेवल्याने घरात गरिबी येते, मात्र तुम्ही झाडू दक्षिण किंवा पश्चिम दक्षिण दिशेला ठेवू शकता. या दिशेला झाडू ठेवणे शुभ मानलं जातं.

यासोबतच झाडू कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावी. वास्तुशास्त्रावर विश्वास असल्यास झाडू उभी करून ठेवू नये, असं केल्याने घरात दारिद्र्य राहतं. याशिवाय घरातील मंडळी घराबाहेर पडल्यावर लगेच कचरा काढू नये. असं केल्याने कामात अपयश येतं. झाडू तुटलेली असेल तरीही अशी झाडू वापरणं अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. असे केल्याने वास्तुदोष निर्माण होतो ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात असंही सांगण्यात आलं आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग