मराठी बातम्या  /  Astrology  /  How Gangajal Can Be Used In House

Vastu Tips : घरातले कलह, वास्तुदोष दूर करतं गंगाजल

गंगाजल
गंगाजल (HT)
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
May 29, 2023 02:47 PM IST

Benefits Of Gangajal : भगवान शिवाच्या जटांमधून गंगेच्या उगम झाला आणि भगिरथाच्या अथक प्रयत्नांनी गंगा स्वर्गलोकातून पृथ्वीवर अवतरली. पुराणामध्येही गंगेच्या पाण्याचे चमत्कारिक फायदे सांगण्यात आले आहेत.

गंगेच्या पाण्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. भगवान शिवाच्या जटांमधून गंगेच्या उगम झाला आणि भगिरथाच्या अथक प्रयत्नांनी गंगा स्वर्गलोकातून पृथ्वीवर अवतरली. पुराणामध्येही गंगेच्या पाण्याचे चमत्कारिक फायदे सांगण्यात आले आहेत. घरातल्या सदस्यांना काही त्रास होत असल्यास गंगेचं पाणी किती फायदेशीर ठरतं हे आपण आज पाहाणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना रात्रीच्या वेळी भीती वाटत असेल किंवा वाईट स्वप्न पडत असतील तर झोपण्यापूर्वी नेहमी पलंगावर गंगाजल शिंपडा. असे केल्याने, भयानक स्वप्नांची दहकता कमी होते आणि झोप येते.

जर एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला वाईट नजर लागली असेल तर त्या व्यक्तीवर गंगाजल शिंपडल्यास लागलेल्या वाईट नजरेचे दुष्परिणाम कमी होतात.

वास्तुशास्त्रातही गंगेच्या पाण्याला महत्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर गंगाजलाची एक बाटली घराच्या उत्तर पूर्वेला ठेवावी. असं केल्याने घरातले वास्तुदोष नाहीसे होतील. 

सोमवारी शिवपूजेच्या वेळी गंगेच्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक केल्यास भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात. जीवनातून सर्व विकार नष्ट होण्यास मदत होते.

जर घरामध्ये वास्तुदोष असेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर घरात नियमितपणे गंगाजल शिंपडा. असे नियमित केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव संपतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.घरात वेळोवेळी गंगाजल शिंपडावे.

जर घरातील सदस्यांमध्ये सारखा क्लेश होत असेल तर दररोज सकाळी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. या उपायाने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते.

ग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की गंगेच्या पाण्यात बुद्धिमत्ता वाढवण्याची आणि पचनक्रिया मजबूत करण्याची शक्ती आहे. गंगेचं पाणी जी व्यक्ती पीते ती व्यक्ती दीर्घकाळ जगते असं सांगण्यात आलं आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग