मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope today 24 January 2023 : रेंगळलेली कामे होणार पूर्ण; तर 'यांना' होणार धनलाभ, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope today 24 January 2023 : रेंगळलेली कामे होणार पूर्ण; तर 'यांना' होणार धनलाभ, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Jan 24, 2023 05:50 AM IST

Today's Rashi Bhavishya : कसा असेल तुमचा आजचा दिवस? नक्षत्रांची स्थिती काय आहे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

Horoscope today 24 January 2023
Horoscope today 24 January 2023 (HT)

मेष: आज शततारका नक्षत्रातुन चंद्र भ्रमण करत असताना लाभ स्थानातील ग्रहयोगामुळे रोजगारात रेंगाळलेल्या कामाना गती देण्यासाठी इष्ट दिवस राहिल. दिनमान लक्ष्मीप्रद आहे. व्यापारात नवीन योजना आमलात आणा. आर्थिक व्यवहाराकरीता उपयोगी दिवस राहिल. मंगलकार्येही घडतील धार्मिक कार्य वास्तुप्रवेश,प्रवास या दृष्टीने योग्य काळ आहे. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. शत्रुवर सरशी राहील. उर्जावान व आविश्वासपूर्ण दिवस राहिल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. जनसंपर्क वाढेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा : दक्षिण.

वृषभ: आज राहुच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात आर्थिक लाभ उत्तम होईल. रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात रममाण व्हाल. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून व्यवसायात असणाऱ्यांची चांगली उन्नती होईल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल रहिल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशा: वायव्य.

मिथुन: आज भाग्यस्थानातील ग्रहयोगामुळे भाग्यकारक दिनमान असेल. नोकरीत बदली किंवा बढ़ती मिळण्याचा योगत आहे. वेतनवाढ होईल. अडकलेली रक्कम मिळेल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. बौद्धिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावेल. संततीकडून शुभवार्ता समजतील. विधायक कार्याची मुहूर्तमेढ करू शकाल. नवीन उपक्रम राबवु शकला. घरगुती वातावरण चांगले राहिल. उन्नतीकारक कारक दिवस असेल.

शुभरंगः हिरवा, शुभदिशा: उत्तर.

कर्क: आजच्या चंद्रभ्रमणात समिश्र स्वरूपाची फले मिळतील. रोजगारात आळस झटकून कामाला लागल्यास निश्चितच लाभ होईल. दैवी पाठबळ काहीस कमी आहे. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. विरोधक कारवाया करण्याची संधी सोडणार नाहीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. भावडांशी संबध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. व्यापारात आकस्मित हानी संभवते. कामगारावर सर्वस्व अवलंबुन राहू नका. अनपेक्षित हानी होईल. कौटुंबिक जिवनात बोलण्यावर नियंत्रण ठेवून कटुता टाळा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. अपघात भय संभवते.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य.

सिंह: आज शततारका नक्षत्रातील होणारे चंद्रभ्रमणात रोजगारात यश मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातुन घडेल. मानसन्मान वाढीस लागेल. आरोग्याची उत्तम साथ लाभेल.

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व.

कन्या : आजच्या नक्षत्र भ्रमणात असफलता येण्याची शक्यता आहे. रोजगारात आपल्या विरोधात गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची संभावना आहे. शत्रु गुप्तशत्रुचा त्रास वाढेल. दिनमान अनिष्ठ असल्याने मनाची चलबिचल, अस्थिरता वाढेल. व्यापारात मोठी गुंतवणूक नवीन योजना राबवू नका. कायदा व नियमच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर एखादी अप्रीय घटना घडेल. नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी लागेल. जुन्या प्रॉपर्टीचा प्रश्न अचानक उद्भभवेल. आपल्या हातून वाईट अनैतिक कृत्य होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर.

तुला: आज चंदनक्षत्र भ्रमणात स्वीकारलेली कामे यशस्वी कराल. आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक संकटाना तोंड द्याल. काम विचार पुर्वक करा. रोजगारात विरोकावर मात करण्यात यशस्वी व्हाल. आपले कर्तुत्व उजाळून निघेल. रचलेले डावपेच यशस्वी होतील. व्यापारात फायदा होऊन समाजात मानसन्मान वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल.कर्जप्रकरणे मंजुर होतील. पैशाची आवक पेक्षा खर्चाचे प्रमाण त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक पातळीवर उत्साहाचे वातावरण राहील. आजचाच दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशा: पश्चिम.

वृश्चिक: आज शततारका नक्षत्रातील चंद्रभ्रमण दिवस उत्तम असा राहिल. मनासारख्या घटना घडतील. रोजगारात आपले कर्तुत्व सिद्ध कराल. कामात पत वाढेल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. काहींना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल. संतती संबंधी शुभवार्ता समजतील.शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. बेरोजगारांना रोजगार मिळतील. आंनदायक दिवस राहील.

शुभरंगः ताबडा, शुभदिशा: दक्षिण.

धनू : आज राहुच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात उन्नतीकारक दिवस असेल. कर्तुत्व स्थानातील ग्रहयोगामुळे उत्पन्नाचे मार्ग वाढवाल. रोजगारात नवीन काम यशस्वीरित्या पार पाडातल. आत्मविश्वासाने काम केल्यास कामात प्रगती राहील. सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. वारसाहक्कातुन प्रॉपर्टीचा लाभ होईल. वाहन,घर खरेदीचा योग आहे. भाऊबहिणीकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन सुखकारक राहिल. संततीकडून शुभवार्ता मिळतील. नवीन संबंध कायदेशीर ठरतील. आपल्या कार्यक्षेत्रात इतरांकडे निष्कारण संशयाने पाहू नका

शुभरंग: पांढरा, शुभदिशाः वायव्य.

मकर: आज धनस्थानातील चंद्रभ्रमणात कौटुंबिक पातळीवर सलोख्याचे वातावरण राहिल. कुटुंबातील सदस्याची प्राती पाहून मनाला समाधान लाभेल. मन उदारमतवादी राहील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योग अजून काहीना नोकरान प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना बलीना मोठे यश प्राप्त होईल. नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल.

शुभरंगः निळा, शुभदिशाः पश्चिम.

कुंभ: आज लग्नस्थानातील राहुच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमण आपले वर्चस्व सिद्ध करू शकाल. राजकीय व्यक्तींना पदप्राप्ती व प्रतिष्ठा लाभेल.मोठ्या व्यक्तींच्या संबंधामुळे आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. शासकीय कामकाजात यश येईल.आपल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ परिमाणाची अपेक्षा केल्यास वावगे ठरणार नाही. नवीन संधी प्राप्त होतील. धनस्थानातील गुरूमुळे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. आर्थिक स्थिती चांगली राहिल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची जबाबदारी मिळू शकते. कौटुबिक पातळीवर वादविवाद टाळावेत. महत्वाची कागदपत्रे हाताळताना काळजी घ्यावी.

शुभरंगः लाल, शुभदिशा: दक्षिण.

मीन : आजचं राहुच्या नक्षत्रातून भ्रमण होत असताना नोकरीत विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. लग्नस्थ गुरूमुळे देव, अध्यात्मा प्रती श्रद्धा वाढेल. गुढशास्त्राची आवड निर्माण होईल. कुटुंबाच्या सदस्याच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊ नयेत. आरोग्याची काळजी घ्या.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य.

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel