मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nana Patole : थोरातांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्या विरोधात नाना पटोलेंनी दंड थोपटले! म्हणाले…

Nana Patole : थोरातांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्या विरोधात नाना पटोलेंनी दंड थोपटले! म्हणाले…

Jan 13, 2023, 07:35 PM IST

  • Nana Patole on Satyajeet Tambe : निवडणुकीतून अचानक माघार घेऊन पक्षाला तोंडघशी पाडणारे सुधीर तांबे व त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Thorat - Tambe - Patole

Nana Patole on Satyajeet Tambe : निवडणुकीतून अचानक माघार घेऊन पक्षाला तोंडघशी पाडणारे सुधीर तांबे व त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.

  • Nana Patole on Satyajeet Tambe : निवडणुकीतून अचानक माघार घेऊन पक्षाला तोंडघशी पाडणारे सुधीर तांबे व त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Nana Patole on Sudhir Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला तोंडघशी पाडणारे डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात नाना पटोले यांनी दंड थोपटले आहेत. तांबे पिता-पुत्रांविरोधात पटोले यांनी दिल्लीत तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

पक्षानं अधिकृत उमेदवारी जाहीर करून व एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी काल अचानक निवडणुकीतून माघार घेतली व मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. तांबे यांच्या या भूमिकेमुळं काँग्रेस पक्षात संताप आहे. नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये मीडियाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. 'सगळ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नाशिकमध्ये जे काही घडलं, ते हायकमांडला कळवलं आहे. हायकमांडचा निर्णय आज अपेक्षित आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. बंडखोर उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असं ते म्हणाले.

'पक्षानं सुधीर तांबे यांना तिकीट दिलं होतं. त्यांनी फॉर्म न भरता पक्षाची फसवणूक केली आहे. स्वत:च्या मुलाला अपक्ष उभे करून ते भाजपचा पाठिंबा घेणार आहेत. ही एक प्रकारची दगाबाजी आहे, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला.

भाजपवरही पटोले यांनी टीका केली. ‘भीती दाखवून घरं फोडण्याची जी कामं भाजपनं सुरू केलीत, त्याचा आता त्यांना आनंद होत असेल. पण ज्या दिवशी त्यांचं घर फुटेल, तेव्हा त्यांना खरं दु:ख समजेल, असा सूचक इशाराही पटोले यांनी दिला. ‘भाजप आणि तांबे यांचं आधीच ठरलं होतं हे आता स्पष्टच दिसत आहे. भाजपनं अर्ज न भरल्यानं ते उघडच झालंय. त्या भागातील पदवीधर मतदारही हे सगळं पाहत आहेत. ते अडाणी नाहीत, असं पटोले म्हणाले. 

काल दुपारनंतर थोरातांशी संपर्क नाही!

सुधीर तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे दाजी असून सत्यजीत तांबे हे भाचे आहेत. त्यामुळं पत्रकारांनी पटोले यांनाही याबाबत प्रश्न विचारला. त्यावर पटोले म्हणाले, ‘बाळासाहेब थोरात काल दुपारपर्यंत संपर्कात होते. मात्र, हे सगळं झाल्यानंतर त्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही.’

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या