मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Arthritis Problem: हिवाळ्यात वाढतो सांधेदुखीचा त्रास? प्रतिबंधासाठी करा 'हे' उपाय

Arthritis Problem: हिवाळ्यात वाढतो सांधेदुखीचा त्रास? प्रतिबंधासाठी करा 'हे' उपाय

Jan 21, 2023, 08:41 PM IST

    • Winter Health Care: हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तुम्ही यापासून प्रतिबंध करण्यासाठी तज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स फॉलो करु शकता.
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी उपाय

Winter Health Care: हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तुम्ही यापासून प्रतिबंध करण्यासाठी तज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स फॉलो करु शकता.

    • Winter Health Care: हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तुम्ही यापासून प्रतिबंध करण्यासाठी तज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स फॉलो करु शकता.

Tips to Prevent Arthritis: हिवाळयात सांधेदुखीचे प्रमाण वाढते. सांधे जखडणे, सुजणे, वेदना होणे इत्यादी सांध्याबद्दलच्या अनेक तक्रारी हिवाळ्यात दिसून येतात. थंडीमुळे शारीरीक हलचाली प्रमाण कमी झाल्याने देखील सांधे जखडल्यासारखे वाटतात. यापासून बचाव करण्यासाठी पुणे येथील अपोले स्पेक्ट्रा येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विश्वजीत चव्हाण यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

वैद्यकीय भाषेत सांधेदुखीला ऑस्टिओआर्थरायटीस म्हणून संबोधले जाते. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. अनुवंशिकता, वाढलेले वजन, व्यायामाची कमतरता, अपुरे पोषण यामुळेही गुडघेदुखीची समस्या उद्भवते.

सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी उपाय

उबदार कपडे घाला - थंडीमध्ये तुमचे संपुर्ण अंग झाकले जाईल असे उबदार कपडे घाला. जेणेकरुन सांध्यांना ऊब मिळेल.

व्यायाम - थंडीत बऱ्याचदा शारिरीक हलचाली मंदावतात व त्यामुळे वजन वाढून सांधेदुखीचा त्रास आणखी बळावू शकतो. चालणे हा सर्वांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. म्हणूनच घरात असतानाही हालचाल करत राहा. व्यायामाने शरीर लवचिक होऊन वेदना कमी व्हायला मदत होते. मात्र फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानेच व्यायाम करणे योग्य राहिल. चुकीचा व्यायाम तुमचे दुखणे आणखी वाढवू शकतो.

हिटींग पॅड वापरा - इलेक्ट्रिक हीटिंग पॅडचा किंवा गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करा. परंतु हे दोन्ही वापरताना काळजी घ्यायला हवी. कारण या दोन्ही गोष्टी झोपताना खुप काळ अंगाखाली राहिल्याने सांधेदुखीच्या वेदना तर कमी होतील परंतु त्वचा मात्र भाजली जाऊ शकते. या दोन्ही वस्तूंचा वापर पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त करू नये. डायबेटिक न्यूरोपथीच्या पेशंटनी वाफेचा अथवा हीटिंग पॅडचा खूप काळजीपूर्वक उपयोग करायला हवा.

संतुलित आहार - नेहमी संतुलित आहाराचे सेवन करा. ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरतील. ओमेगा ६ फॅटी अॅसिड असलेले खाद्यपदार्थ शक्यतो टाळा. त्याच्यामुळे सांधेदुखी वाढु शकते.

हायड्रेटेड रहा - शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे सांधेदुखीच्या वेदना आणखी वाढू शकतात. म्हणून भरपूर पाणी प्या.

वजन कमी करा - कमी शारीरिक हालचालीमुळे सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. वजन असल्यास वेदनांमध्ये ही वाढ होते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा.

ड जीवनसत्व - व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा आजार बळावू शकतो. त्यामुळे सकाळचे कोवळे सूर्यप्रकाश घ्या, आहारात व्हिटॅमिन डी चा समावेश करा तसेच तज्ज्ञांच्या सल्लाने औषधांचे सेवन करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या