मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Guide: फेब्रुवारीमध्ये पार्टनरसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? या ठिकाणी करु शकता बजेटमध्ये ट्रिप

Travel Guide: फेब्रुवारीमध्ये पार्टनरसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? या ठिकाणी करु शकता बजेटमध्ये ट्रिप

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 17, 2023 09:11 PM IST

Budget Freindly Trip: फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन डे याच महिन्यात येतो. अशा परिस्थितीत तुमच्या पार्टनरसोबत हँग आउट करण्यासाठी पहा हे काही डेस्टिनेशन्स.

ट्रॅव्हल टिप्स
ट्रॅव्हल टिप्स

Places for Couples to Visit in February: भारतात फिरण्यासाठी अनेक ठिकाणेआहेत, जे खूप सुंदर आहेत. येणारा महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात बहुतेक लोक त्यांच्या पार्टनरसोबत व्हेलेंटाईन साजरे करण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधत असतात. आम्ही येथे काही सुंदर प्लेसेस सांगत आहोत, जी कपल्ससाठी सर्वोत्तम आहेत. चांगली गोष्ट म्हणजे येथे स्वस्तात ट्रीपचे आयोजन केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या काही बजेटमध्ये पूर्ण होऊ शकणार्‍या ठिकाणांची नावं.

जयपूर

कपलसाठी हे एक चांगले डेस्टिनेशन आहे. लोक अनेकदा येथे भेट देण्याची योजना करतात. तुम्ही या ठिकाणी सहज आणि स्वस्तात पोहोचू शकता. पिंक सिटीमध्ये तुम्हाला अनेक बजेट फ्रेंडली हॉटेल्स सहज मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या ठिकाणाचा नक्कीच आनंद घ्याल.

ऋषिकेश

धार्मिक स्थळ असण्यासोबतच ते तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला नदीच्या काठावर अनेक लोक योगाभ्यास करताना दिसतील. नदीकाठी जोडीदारासोबत तंबूत वेळ घालवणे हा एक अद्भुत अनुभव आहे.

उदयपूर

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शाही स्थळी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही उदयपूरला जाऊ शकता. तुम्हाला येथील सुंदर तलाव आणि किल्ले आवडतील. उदयपूरला जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ट्रेन. इथे फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत.

उटी

उटी हे भारतातील सर्वोत्तम हिल स्टेशनपैकी एक आहे. निलगिरी, हिरवेगार चहाचे मळे, वळणदार रस्ते आणि उंच शिखरांवर जोडीदारासोबत चालायला सुरुवात करा. भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम परवडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या ऊटीमध्ये निसर्गाचा ताजेपणा आणि सुगंध लुटण्यासाठी एकत्र या.

बजेट ट्रिप कशी करावी

बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जसे की स्वस्त ट्रॅव्हल मोड किंवा स्वस्त हॉटेल निवडणे. यासोबतच खाण्यापिण्याबाबतही स्पेसिफिक असावे लागते. महागड्या रेस्टॉरंट टाळण्याचा प्रयत्न करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग