मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Air India Safety Film: विमान प्रवासाची सुरक्षा सांगण्यासाठी शास्त्रीय नृत्याचा अनोखा वापर, व्हिडिओने केले लोकांना मंत्रम

Air India Safety Film: विमान प्रवासाची सुरक्षा सांगण्यासाठी शास्त्रीय नृत्याचा अनोखा वापर, व्हिडिओने केले लोकांना मंत्रम

Feb 24, 2024, 09:47 PM IST

  • Air India Video: एअर इंडियाने एक्सवर नुकतेच इनफ्लाइट सेफ्टीचा अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण नृत्य परंपरेपासून प्रेरित एअर इंडियाची नवीन सेफ्टी फिल्म सादर करीत आहे.

एअर इंडियाचे नवीन इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ, जे भारतातील विविध नृत्य प्रकार साजरे करते. (X/@airindia)

Air India Video: एअर इंडियाने एक्सवर नुकतेच इनफ्लाइट सेफ्टीचा अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण नृत्य परंपरेपासून प्रेरित एअर इंडियाची नवीन सेफ्टी फिल्म सादर करीत आहे.

  • Air India Video: एअर इंडियाने एक्सवर नुकतेच इनफ्लाइट सेफ्टीचा अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण नृत्य परंपरेपासून प्रेरित एअर इंडियाची नवीन सेफ्टी फिल्म सादर करीत आहे.

Classical Dance and Folk Art to Tell Inflight Safety: एअर इंडियाने एक्सवर आपला नवीन इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ सादर केला आहे, ज्यात भारताचा सांस्कृतिक वारसा साजरा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये देशभरातील विविध शास्त्रीय नृत्य आणि लोककला प्रकारांच्या माध्यमातून उड्डाण करताना सुरक्षेच्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचे दाखवण्यात आले आहे. या अनोख्या संकल्पनेने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे असून या व्हिडिओ लोकांना मंत्रमुग्ध केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

शतकानुशतके भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोककला प्रकार हे कथाकथन आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून काम करत आले आहेत. आज ते आणखी एक गोष्ट सांगतात, ती म्हणजे इनफ्लाइट सेफ्टीची. भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण नृत्य परंपरेने प्रेरित असलेला एअर इंडियाचा नवी सेफ्टी फिल्म सादर करत आहे,' असे एअरलाइन्सने व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे.

"एअर इंडियाच्या नवीन सेफ्टी व्हिडिओमध्ये आठ शास्त्रीय आणि भारतीय लोकनृत्य प्रकार आहेत, ज्यात प्रत्येक मुद्रा किंवा नृत्य हावभाव वेगळ्या सूचनांशी सुसंगत आहे", असे एअरलाइन्सने यूट्यूबवर हाच व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे. भरतनाट्यम, ओडिसी, कथकली, मोहिनीअट्टम, कथ्थक, घूमर, बिहू आणि गिद्दा हे नृत्य प्रकार व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहेत.

पाहा एअर इंडियाचा भन्नाट व्हिडिओ:

हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून, ही क्लिप दहा लाखांहून अधिक व्ह्यूवजसह व्हायरल झाली आहे. आणि व्ह्युवजची ही संख्या अजूनही वाढत आहे. या शेअरमुळे लोकांनी विविध प्रतिक्रिया पोस्ट केल्या आहेत.

एअर इंडियाच्या या व्हिडिओवर एक्स युजर्सनी कशी प्रतिक्रिया दिली?

एका एक्स युजरने सांगितले की, "क्लासी सेफ्टी फिल्ममध्ये सुंदररित्या क्लासिकल. तर दुसऱ्याने प्रतिक्रिया देताना "वाह. वाह. वाह. होय, हाच शब्द इथे योग्य आहे,' असे म्हटले आहे. आपल्या देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती किती छानपणे मांडली आहे, वेल डन!" असे तिसऱ्याने पोस्ट केले.

"मोकळ्या हवेत घेतलेला श्वास! टेप-रेकॉर्डेड स्क्रिप्ट किंवा फ्लाइट अटेंडंटच्या अनइंटरेस्टेड ड्रिलऐवजी कलरफुल, रंगीबेरंगी, व्हायब्रंट आणि जिवंत अशा प्रकारे परिपूर्ण सुरक्षा सूचना," अशी कमेंट चौथ्याने केली आहे. विमानातील सुरक्षिततेच्या महत्त्वावर भर देताना भारतीय परंपरेचे मर्म दाखवण्याचा हा एक आनंददायी मार्ग आहे. या क्रिएटिव्हीटी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल एअर इंडियाचे अभिनंदन! अशे मत पाचव्या युजरने मांडले आहे.

एअर इंडियाच्या या सेफ्टी फिल्मबद्दल तुमचे काय मत आहे? हा व्हिडिओ तुम्हालाही भुरळ पाडतो का?

विभाग

पुढील बातम्या