Viral Video of Chocolate Ice Cream Making: स्टिक्सवर चॉकलेट आइस्क्रीम मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने लोकांना भुरळ घातली आहे. या प्रक्रियेवर आपलं मत मांडण्यापासून ते क्लिपमुळे त्यांना आईस्क्रीम खाण्याची क्रेविंग होत असल्याचे कमेंट करण्यापर्यंत लोकांनी वेगवेगळे ट्विट केले आहे.
हा व्हिडिओ सायन्स गर्ल या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. हे मूळतः जॉर्ज आर्टेगाने २०२१ मध्ये इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. व्हिडिओमध्ये एक मशीन चॉकलेट बार कापून त्यांना स्टिक्सवर तुकडे करत आहे. त्यानंतर प्रत्येक तुकडा वितळलेल्या चॉकलेटमध्ये बुडवला जातो आणि त्यावर नट्सचे तुकडे टॉप केले जातात. एक्स पोस्टसोबत पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये असा ही दावा करण्यात आला आहे की, यात युनिलिव्हरचा आईस्क्रीम ब्रँड मॅग्नम तयार होताना दिसत आहे.
हा व्हिडिओ १५ फेब्रुवारी रोजी पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून ही क्लिप सुमारे १५ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूजसह व्हायरल झाली आहे. आणि ही संख्या अजूनही वाढत आहे. या शेअरमुळे लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या आहेत.
एका एक्स युजरने "वाह. छान प्रक्रिया आहे. चविष्ट दिसतेय,' असे पोस्ट केले आहे. "हे खूप आकर्षक आहे," दुसऱ्याने शेअर केले. "का माहित नाही पण हे पाहून समाधान मिळते," असे तिसऱ्याने कमेंट केली आहे. "काहीतरी मसालेदार खाल्ल्यानंतर आईस्क्रीमची चव चांगली लागते," असे मत चौथ्याने व्यक्त केले. पाचव्याने लिहिलं, "मला त्याची चव चाखता येईल का?"
आईस्क्रीमची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्याच्या या व्हिडिओवर तुमचे काय मत आहे? यामुळे तुम्हाला सुद्धा खाण्याची क्रेविंग होतेय का?