Kiran Rao Viral Video: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याची माजी पत्नी किरण राव नेहमीच काहीना काही कारणाने माध्यमांमध्ये चर्चेत असते. नुकतंच तिने आपल्या सावत्र लेकीचं लग्न गाजवलं. आयरा खानच्या लग्नात किरण रावची भरपूर चर्चा पाहायला मिळाली होती. आता किरण राव तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. किरण राव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने किरण राव पुन्हा एकदा बिग बजेट प्रोजेक्ट करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आता किरण रावने असं काही केलं की, ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
किरण राव सध्या तिच्या आगामी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्माती-दिग्दर्शिका किरण राव चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच दिल्लीतील कॅनॉट प्लेसला पोहोचली होती. यावेळी तिने दिल्लीतील एका छोट्याशा टपरीवर फायर पानाची चव चाखली. किरण राव हिने पहिल्यांदाच फायर पान हा प्रकार पाहिला. तिचा फायर पान खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘लापता लेडीज’च्या प्रमोशन दरम्यान किरण रावने कॅनॉट प्लेस येथे फायर पानचा आस्वाद घेतला. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उत्तर भारतात या हटके फायर पानाची प्रचंड क्रेझ आहे. आता ‘लापता लेडीज’च्या निमित्ताने दिल्लीत असलेल्या किरण राव हिला तिच्या टीमने या फायर पानाची चव चाखण्याचा सल्ला दिला. किरण राव हिने देखील हा पानाचा हटके प्रकार खाऊन आपला अनुभव देखील शेअर केला आहे.
किरण राव हिने इन्स्टाग्रामवर फायर पान खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबरच तिने तिचा अनुभव देखील शेअर केला आहे. आपला अनुभव सांगताना किरण राव म्हणाली की, ‘कॅनॉट प्लेसमधील पीव्हीआर प्लाझाच्या बाहेर ही व्यक्ती फायर पान नावाचा प्रकार बनवते. त्याचा स्वाद मी एकदा तरी घ्यावा असा आग्रह माझ्या टीमने केला. मला पान खायला नेहमीच आवडतं. परंतु, हा एक भन्नाट अनुभव आहे, जो एकदातरी घ्यायला हवा.’
संबंधित बातम्या