Viral Brain Teaser: ब्रेन टीझरमध्ये गणिताशी संबंधित प्रश्नांपासून लॉजिकल रिझनिंग पझलपर्यंत विविध प्रकारच्या कोड्यांचा समावेश होतो. असे अनेक ब्रेन टीझर आहेत जे लोकांना व्यस्त ठेवतात. आणि जर तुम्हालाही असे प्रश्न सोडवायला आवडत असतील तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक पझल आहे. तुम्ही या चॅलेंजसाठी तयार आहात का?
हा ब्रेन टीझर एसआयटी (SIT) नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे. या कोड्यात लिहिलं आहे, "मी खराब असताना पांढरा असतो आणि स्वच्छ असतो तेव्हा काळा असतो. मी काय आहे?"
ही पोस्ट १९ फेब्रुवारी रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून या टीझरला जवळपास एक हजार लाईक्स आणि असंख्य कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपली उत्तरे शेअर केली आहेत. अनेकांनी 'ब्लॅकबोर्ड' हे या कोड्याचे उत्तर असल्याचे सांगितले. तर इतर काहींनी 'केस' आणि 'कोळसा' हे ही उत्तर आहे म्हणून सांगितले.
याचे उपाय काय आहे, असं तुम्हाला वाटतं?
याआधी ब्रेनचा आणखी एक टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात प्रश्न असा आहे की, "जर एन्ट्री (ENTRY)12345 आणि स्टेडी (STEADY) 931785 म्हणून कोड केले गेले असेल तर टेनंटला (TENANT)ला काय कोड केले जाईल?"
तुम्ही हे कोडं सोडवू शकता का?