मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना भरभराटीचा दिवस! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना भरभराटीचा दिवस! वाचा चारही राशींचे भविष्य!

Apr 28, 2024, 11:55 AM IST

    • Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 28 April 2024 : आज २८ एप्रिल २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 28 April 2024 : आज २८ एप्रिल २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

    • Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 28 April 2024 : आज २८ एप्रिल २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज शिव योग आहे. चंद्र मुळ नक्षत्रातुन आणि धनु राशीतुन भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : विनायक चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 11, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : अक्षय्य तृतीयेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 10, 2024 04:00 AM

Akshay Tritiya 2024: एक-दोन नव्हे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ५ महायोग! ‘या’ राशींना मिळणार भरपूर फायदा

May 09, 2024 05:34 PM

Rashi Bhavishya Today : वैशाख मासारंभचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 09, 2024 04:00 AM

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेनंतर ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार

May 08, 2024 03:17 PM

Rashi Bhavishya Today : चैत्र अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 08, 2024 04:00 AM

सिंहः 

आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.

कन्याः 

आज शिव योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः हिरवा, शुभअंकः ०३, ०६.

तूळ 

आज अनिष्ट चंद्रभ्रमणात सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सागता येत नाही आणि त्यातून कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध रहा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यो टाळा. आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

वृश्चिकः 

आज शिव योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रा मध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्या मुळे विवेक ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

शुभरंगं: तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

पुढील बातम्या