Abdu Rozik: अब्दू रोजिक हे नाव आता जगभरात माहित आहे. रॅप गाणी आणि त्याच्या विशेष प्रतिभेमुळे अब्दूला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचे रॅप गाणे ‘ओही दिली ढोर’ जगभर प्रसिद्ध झाले आणि तो रातोरात स्टार झाला. अब्दूने ‘बिग बॉस १६’मध्ये भाग घेऊन खूप प्रसिद्धी मिळवली. हा शो संपल्यानंतरही अब्दूची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. नुकताच अब्दू रोजिक विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी त्याला चाहत्यांनी गराडा घातला होता.