आज देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील पाच तर, देशात १०२ जागांवर मतदान होत आहे. हे मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी राज्यातील मतदारसंघात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये कलाकारांनी मतदान केले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.