मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ajinkya Rahane: मुलगा झाला हो! रहाणेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, जिंक्सची चाहत्यांसाठी खास पोस्ट

Ajinkya Rahane: मुलगा झाला हो! रहाणेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, जिंक्सची चाहत्यांसाठी खास पोस्ट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 05, 2022 05:49 PM IST

Ajinkya Rahane News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा पिता झाला आहे. त्याची पत्नी राधिकाने एका मुलाला जन्म दिला आहे.

Ajinkya Rahane
Ajinkya Rahane

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने बुधवारी सकाळी मुलाला जन्म दिला. टीम इंडियाचा खेळाडू रहाणेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली. रहाणेने सांगितले की, राधिका आणि तिचा मुलगा पूर्णपणे स्वस्थ आहेत. रहाणेने मुलाच्या जन्मानंतर चाहत्यांसाठी एक खास पत्रही सोशल मीडियावर शेअर केले आहे.

रहाणेने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक पत्र शेअर केले आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “बुधवारी सकाळी त्याची पत्नी राधिकाने मुलाला जन्म दिला. राधिका आणि मूल दोघेही सुखरुप आहेत. प्रार्थनांसाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत”.

विशेष म्हणजे अजिंक्य रहाणेने सप्टेंबर २०१४ मध्ये राधिका धोपावकरसोबत लग्न केले. दोघांचे लग्न मराठी रितीरिवाजाने पार पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिंक्स आणि राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. राधिकाने २०१९ मध्ये एका मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव आर्या आहे.

 

WhatsApp channel