मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul जर्मनीत पोहोचला, महिनाभर चालणार उपचार

KL Rahul जर्मनीत पोहोचला, महिनाभर चालणार उपचार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 20, 2022 09:50 PM IST

केएल राहुल (kl rahul) आता जवळपास एक महिना जर्मनीमध्ये राहणार आहे. त्यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये उपलब्ध होऊ शकतो.

kl rahul
kl rahul

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका सुरु होण्यापूर्वी भारताचा सलामीवीर के एल राहुल जखमी झाला. त्यामुळे त्याला आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला तर मुकावे लागलेच, पण त्याला इंग्लंडविरुद्धही संघाबाहेर राहावे लागणार आहे. आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडलेला भारताचा सलामीवीर केएल राहुल उपचारासाठी जर्मनीला पोहोचला आहे. ३० वर्षीय हा कंबरेच्या दुखापतीने त्रस्त आहे. राहुल याच्या उपचारासाठीच जर्मनीला पोहोचला आहे. त्याने स्वतः हा सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. या फोटोनंतर क्रिकेट चाहते राहुल लवकर बरा होऊन परतावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

केएल राहुल आता जवळपास एक महिना जर्मनीमध्ये राहणार आहे. त्यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये उपलब्ध होऊ शकतो. केएल राहुल आयपीएल २०२२ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्याला आयपीएल २०२२ मध्ये देखील वेदना होत होत्या परंतु त्यावेळी हे प्रकरण इतके गंभीर नव्हते.

दरम्यान, राहुलला उपचारासाठी जर्मनीला पाठवले जाईल, असे बीसीसीआयने यापूर्वीच सांगितले होते. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, "बोर्ड त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. तो लवकरच जर्मनीला जाणार आहे."

WhatsApp channel

संबंधित बातम्या