बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत दिसत आहे. सध्या दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.
(Instagram/@who_wore_what_when)विद्या आणि प्रतिकने नुकताच ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला 'तू पॉर्न फिल्म्स पाहतेस का?' असा प्रश्न विचारला होता. त्यावर विद्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
(Instagram/@who_wore_what_when)"खरं सांगायचं झालं तर मला कधीच पॉर्न ही संकल्पना पटली नाही. कारण दोन लोकांचे शारीरिक संबंध पहायला मला आवडत नाही किंबहुना मला ते पहायचंच नाही. जर एखाद्या चित्रपटातील असा सीन असेल किंवा त्याला संवेदनशील पद्धतीने शूट केलं असेल, त्या सीनमागे चांगली कथा असेल तर मला पहायला काहीच समस्या नाही" असे विद्या म्हणली.
(Instagram/@who_wore_what_when)पुढे ती म्हणाली, "मी स्वत: कधी असे ठरवून पॉर्न पाहिलेला नाही. जे काही एक-दोन सीन्स पाहिले असतील, त्यातून मला इतकेच वाटले की अशा फिल्म्समध्ये फक्त स्त्रियांना एका शरीराच्या रुपात दाखवले जाते. त्यात कोणतीच कथा नसते, फक्त संभोग असतो. त्यामुळे असे सीन्स पाहून मी कधीच ‘टर्न ऑन’ होऊ शकत नाही. म्हणूनच मला पॉर्न पहायला आवडत नाही.”
(Instagram/@who_wore_what_when)