मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भयानक.. संतप्त विद्यार्थ्याची शिक्षिकेला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण, पाहा VIDEO

भयानक.. संतप्त विद्यार्थ्याची शिक्षिकेला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण, पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2023 09:17 PM IST

एका संतप्त विद्यार्थ्याने महिला शिक्षिकेला बेदम मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी धावत येऊन शिक्षकाला जमिनीवर ढकलत असल्याचे दिसत आहे.

विद्यार्थ्याची शिक्षिकेला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण
विद्यार्थ्याची शिक्षिकेला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

भारतीय संस्कृतीत 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः' असे म्हटलं जातं. याचा अर्थ आहे गुरु हाच ईश्वर आहे. हीच गोष्ट लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवली जाते. मात्र कलयुगात शिक्षण व विद्यार्थ्याच्या नात्यात कालानुरुप बराच बदल झाला आहे. कमी मार्क दिल्याने शिक्षकाला हात-पाय बांधून मारल्याची घटना ताजी असताना आता अशाच प्रकारची घटना समोर आली आहे.

तथापि, ताजे प्रकरण अमेरिकेतील असून या विद्यार्थ्याने आपल्या महिला शिक्षिकेला जमिनीवर ढकलून लाथा घातल्या. संतापलेल्या विद्यार्थ्याने महिला शिक्षिकेला एवढी बेदम मारहाण केली की ती बेशुद्ध झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना फ्लोरिडा राज्यातील आहे, जिथे एका संतप्त विद्यार्थ्याने महिला शिक्षिकेला बेदम मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी धावत येऊन शिक्षकाला जमिनीवर ढकलत असल्याचे दिसत आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिला जमिनीवर पडले त्यानंतर चवताळलेला विद्यार्थी तिच्या अंगावर बसून तिला मारहाण करून तसेच लाथा घालतो. ही घटना पाहून कॅम्पसमधील लोक घटनास्थळी धावत येतात व विद्यार्थ्याला शिक्षिकेपासून वेगळे करतात. त्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. फ्लॅगलर काउंटी शेरीफ कार्यालयाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी विद्यार्थी बेड्या घालून बसलेला दिसत आहे.

 

पोलिस आल्यानंतर विद्यार्थ्याने परत आल्यावर शिक्षिकेला ठार मारण्याची धमकी दिली.

IPL_Entry_Point

विभाग