मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rape: मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, व्हिडिओही बनवला; तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Rape: मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, व्हिडिओही बनवला; तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 21, 2023 12:51 PM IST

Ghatkopar Gangrape: मुंबईच्या घाटकोपर परिसरात मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने आजुबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Mumbai Rape
Mumbai Rape (HT_PRINT)

Maharashtra Gangrape: मुंबईच्या घाटकोपर परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतिमंद मुलीवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित सार्वजनिक शौचालयात जात असताना आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. तसेच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडिताच्या वडिलांना घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भादवि कलम पोस्को तसेच आयपी अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद केली.

मुंबईतील घाटकोपर परिसरात मतिमंद मुलगी निसर्गाच्या सान्निध्यात गेली असता तिच्यावर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी सार्वजनिक शौचालयात जात असताना आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. पीडित मुलीच्या भावाने व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला आणि नातेवाईकांना याची माहिती दिली. घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवले असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग