मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bombay High Court: अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे पडले महागात; हायकोर्टाने वकिलाला ठोठावला दंड
 Bombay High Court
Bombay High Court (HT_PRINT)

Bombay High Court: अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे पडले महागात; हायकोर्टाने वकिलाला ठोठावला दंड

14 January 2023, 9:15 ISTNinad Vijayrao Deshmukh

Bombay High Court : कोर्टात अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे एका वकिलाला चांगलेच महागात पडले आहे. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत विकिलाला फटकरत त्याला दंड ठोठावला आहे.

मुंबई : अल्पवयीन बलात्कार पिडीतेची ओळख उघड करणे कायद्याने मनाई आहे. मात्र, एका वकिलानेच कोर्टात पीडितेच्या आईची ओळख उघड केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने यची गंभीर दखल घेत, वकिलाला फटकारत त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वकील हृषिकेश मुंदरगी आणि मनोज कुमार तिवारी असे न्यायालयाने दंड ठोठवलेल्या वकिलांचे नाव आहे. ही रक्कम या दोघांना १६ जानेवारीपर्यंत कीर्तिकर लॉ लायब्ररीला भरण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठाने याचिकेत सुधारणा देखील केली असून पीडितेच्या आईचे नाव आणि माहिती काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

पोक्सो कायद्यांनुसार अल्पवयीन बलात्कार पीडीतेची ओळख उघड करणे कायद्याने मनाई आहे. पीडितेची आणि कुटुंबाची माहिती उघड करणे गुन्हा आहे. असे असतांनाही या वकिलांनी पीडितेची ओळख उघड केल्याने ही कारवाई केली आहे.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने या वकिलांवर कारवाई केली आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी याचिकेत पीडितेच्या आईची ओळख उघड केली होती. वकिलांनी या याचिकेत पीडितेच्या आईचे नाव, फोटो, चॅट आणि ईमेल जोडल्याने पोस्को कायद्याचे उल्लंघन झाले. या कायद्यानुसार पीडित अल्पवयीन मुलीचे फोटो, नाव आणि गावच नव्हे तर तिची ओळख पटू शकेल, असा कोणताही पुरावा वापरणे गुन्हा असतांना या वकिलांनी तिची ओळख पटेल असे पुरावे दिल्याने कोर्टाने कारवाई केली. या आधी देखील न्यायमूर्ती रेवती मोहिते यांनी बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकिलाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. ही घटना ऑक्टोबर २०२२ मध्ये झाली होती. तर एका प्रकरणात वकिलाल २५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला होता.

 

विभाग