मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : अजित पवार त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देणार स्कॉर्पिओ आणि बोलेरो कार, कारण काय?

Ajit Pawar : अजित पवार त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देणार स्कॉर्पिओ आणि बोलेरो कार, कारण काय?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 28, 2023 10:53 AM IST

Ajit Pawar: पक्षाच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी आमदार अजित पवार गट पदाधिकाऱ्यांसाठी ७० नव्या कार खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली.

Ajit Pawar
Ajit Pawar

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने महाराष्ट्रभरातील आपल्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे ७० कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या गाड्यांच्या किंमती १२ लाख ते २२ लाखापर्यंत असेल. दरम्यान, बुधवारी काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी पक्षाच्या मुख्यलयात नेल्या. अजित पवार गटाचे प्रमुख सुनील तटकरे यांनी याला दुजोरा दिला.

या गाड्या राष्ट्रवादीच्या जिल्हा व शहराध्यक्षांना देण्यात येणार आहेत. त्यातील अनेकांकडे वाहनांवर खर्च करण्यासाठी आर्थिक साधन नसल्याने अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कार्यकर्त्याला कार उपलब्ध करून दिली जाईल, त्यांना पक्षाची उद्दिष्टे काय आहेत हे सांगावे लागेल, पक्षाची बाजू स्पष्ट करावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, संबंधिक कार्यकर्त्याला शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट का पडली, हे सांगावे लागणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने महिंद्रा स्कॉरपिओ आणि बोलेरो निओ अशा दोन गांड्यांना पसंती दर्शवली आहे. बोलोरो नेओची किंमत १० लाख- १२ इतकी आहे. तर, स्कॉर्पिओची किंमत १६ लाख- २२ लाखांपर्यंत आहे. जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या शहराच्या भागांपेक्षा जास्त प्रवास करावा लागतो. कारण, जिल्हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहेत", असे पक्षाच्या आतील सूत्रांनी सांगितले.

अजित पवारांच्या पक्षात जवळपास 36 जिल्हाप्रमुख आणि तेवढेच शहराध्यक्ष आहेत. पुढच्या टप्प्यात आघाडीच्या संघटनांचे नेतृत्व करणाऱ्यांना चारचाकी वाहने देखील मिळतील आणि एकूण गाड्यांची संख्या सुमारे ७० वर नेली जाईल. राष्ट्रवादी पक्षाने असा निर्णय घेण्याची पहिलीच वेळ नाही. यापू्र्वी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीने जिल्हा आणि शहराध्यक्षांना चारचाकी वाटल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष काँगेससह युतीच्या सरकारमध्ये होता.

दरम्यान, २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी बंड पुकारला. त्यानंतर ४० आमदारासह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी शिंदे सरकराने अजित पवार यांना अतिरिक्त उपमुख्यमंत्री म्हणून घोषीत केले. तेव्हापासून अजित पवार आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांनी दावा केला आहे की, त्यांचा पक्ष खरी राष्ट्रवादी आहे. त्यांनी निवडणूक आयोगासमोर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावाही केला आहे, या संदर्भात सुनावणी सुरू आहे.

IPL_Entry_Point

विभाग