मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Colour Personality Test: रंगाद्वारे करा व्यक्तिमत्व चाचणी, जाणून घ्या काही मनोरंजक तथ्ये!

Colour Personality Test: रंगाद्वारे करा व्यक्तिमत्व चाचणी, जाणून घ्या काही मनोरंजक तथ्ये!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 06, 2022 09:50 AM IST

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. त्याची आवडही वेगळी असते. तुम्ही तुमच्या आवडत्या रंगानुसार व्यक्तिमत्व चाचणी देखील करू शकता.

 कलर पर्सनॅलिटी टेस्ट
कलर पर्सनॅलिटी टेस्ट (Freepik)

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि निवड वेगवेगळी असते. खाण्यापिण्यापासून ते कपडे, चपला, कलर्स याची निवड वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीला वेगळा रंग आवडतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्हाला जो रंग आवडतो, तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही बरेच काही सांगून जातो. लोकांच्या पसंतीच्या रंगानुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही रंजक गोष्टीही जाणून घेता येतात. तुमच्या आवडत्या रंगांनुसार तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे हे जाणून घ्या.

लाल रंग

अनेकांना लाल रंग आवडतो. अशा लोकांना नवीन लोकांशी बोलायला आवडते. ते खूप धैर्यवान आणि आत्मविश्वास असलेल्या व्यक्ती असतात. त्याचा स्वभाव खूप आशावादी असतो.

पिवळा रंग

ज्या लोकांना पिवळा रंग आवडतो ते खूप आनंदी असतात. त्यांना मजा करायला आवडते. त्याच्या आयडिया खूप चांगल्या असतात.

हिरवा रंग

ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो. ते लोक खूप उदार आणि दयाळू असतात. अशा लोकांची वागणूक इतरांप्रती खूप प्रेमळ असते.

गुलाबी रंग

अनेकांना गुलाबी रंग आवडतो. हे लोक खूप प्रेमळ असतात. ते इतरांबद्दल खूप संवेदनशील असतात.

पांढरा

ज्या लोकांना पांढरा रंग आवडतो. त्यांचे व्यक्तिमत्व खूप सकारात्मक आणि आशावादी असते.

काळा

अनेकांना काळा रंग खूप आवडतो. त्यांचे व्यक्तिमत्व खूप शक्तिशाली असते. ते अतिशय प्रतिष्ठित असतात तसेच असे लोक दृढनिश्चयी असतात.

तपकिरी

काही लोकांना तपकिरी रंग खूप आवडतो. असे लोक खूप प्रामाणिक असतात. ते डाउन टू अर्थ असतात. त्यांचे समृद्ध व्यक्तिमत्व असते.

वायलेट रंग

हे रंग आवडणारे लोक खूप मोकळ्या मनाचे असतात. हे फार सज्जन व्यक्तिमत्त्वाचे असतात.

निळा रंग

अनेकांना निळा रंग खूप आवडतो. असे लोक खूप विश्वासार्ह असतात. त्यांना गोष्टींमध्ये फारच कमी बदल आवडतात.

केशरी रंग

काही लोकांना केशरी रंग आवडतो. हे लोक स्वभावाने अतिशय मनमिळाऊ असतात.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या