Tata stocks to buy : जर तुम्ही टाटा समूहातील शेअर्स खरेदी करण्याच्या विचारात असाल तर इंडियन हाॅटेल्सच्या शेअर्सवर फोकस करु शकतात. ब्रोकरेज फर्म या शेअर्ससंदर्भात बुलिश आहेत आणि हा स्टाॅक खरेदी करण्याचा सल्ला देतात. हाॅटेल इंडस्ट्रीमधील या कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या ३१७.९० रुपये आहे. यात दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा पोर्टफोलियो समाविष्ट आहे.
ब्रोकरेजचे मत
गेल्या सहा महिन्यात या स्टाॅकमध्ये १५.५ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी पहायला मिळाली आहे. वार्षिक आधारावर या मिडकॅपमध्ये तब्बल ५२ टक्के तेजी आहे. बीएसईवर शुक्रवारी इंडियन हाॅटेल्सचा स्टाॅक १.१६ टक्के घसरणीसह ३१८.१५ वर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप ४५१९० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. नुकतेच, कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत ३८३ कोटी रुपयांचा आॅल टाईम हाय पॅट पोस्ट केला होता. तो संपूर्ण वर्षातील नफ्यापेक्षा अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात जिओजित फायनान्शिअलने सांगितले की या सेअर्समध्ये १२ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. आयएचसीएलने आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत वार्षित आधारावर (एआरआर), चांगला आँक्युपेन्सी दर, उच्च महसूल मध्ये तेजी सह चांगला परफाॅर्मन्स अपेक्षित असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
रेखा झुनझुनवाला प्रमुख गुंतवणूकदार
रेखा झुनझुनवाला ह्या इंडियन हाॅटेल्समधील प्रमुख गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कंपनीतील त्यांचा हिस्सा ३,००,१६,९६५ इक्विटी शेअर्स होती. इंडियन हाॅटेल्स ही देशातील हाॅस्पीटॅलिटी कंपनीतील एक आहे. यात ताज, जिंजर, विवांता यांसारखे बडे ब्रँन्ड्स समाविष्ट आहेत. टाटाच्या कंपनीत ३८.२ टक्के हिस्सा आहे. सध्याच्या काळात कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये २५० पेक्षा अधिक हाॅटेल्सचा समावेश आहे.
(डिस्क्लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या