मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Insurance scheme : तुमचा चांगला ‘क्रे़डिट स्कोअर’ आहे का? या विमा कंपनीची प्रिमियमवर सवलत

Insurance scheme : तुमचा चांगला ‘क्रे़डिट स्कोअर’ आहे का? या विमा कंपनीची प्रिमियमवर सवलत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 09, 2023 07:26 PM IST

Insurance scheme : चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या गुंतवणूकदारांना या कंपनीने विमा प्रिमियमवर सवलत जाहीर केली आहे. जाणून घ्या या सवलतीचा लाभ कशा प्रकारे घेता येईल -

insurance ht
insurance ht

Insurance scheme : ग्राहकांनी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.ने चांगला क्रेडिट स्कोअर आणि चांगला क्रेडिट रिपोर्ट असलेल्या ग्राहकांना विम्याच्या प्रीमियमवर ७.५%* इतका डिस्काउंट देऊ केला आहे. जे कस्टमर रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी खरेदी करणार आहेत किंवा ज्यांना ही पॉलिसी रिन्यू करायची आहे त्यांना त्यांच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर हा विशेष लाभ देण्यात येत आहे.

चांगला क्रेडिट स्कोअर हवा

चांगल्या क्रेडिट स्कोअरमधून ग्राहकांची आर्थिक शिस्त कळून येते. अशा प्रकारच्या शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चांगल्या आर्थिक सवयी अंगी बाणवण्यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने हा क्रेडिट स्कोअरवर आधारित डिस्काउंट सादर केला आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स हेल्थ पॉलिसी सुदृढ जीवनशैली अंगीकारणाऱ्यांना बक्षीस म्हणून त्यांच्या बॉडी मास इंडेक्सच्या (बीएमआय) आधारे प्रीमिअमवर डिस्काउंट देते. सामान्य बीएमआय असलेले ग्राहक प्रीमियमवर डिस्काउंट मिळवू शकतात.

कोविड १९ ची लस घेतलेल्यांना विशेष सवलत

लस घेणाऱ्या व्यक्तींनाही कंपनीतर्फे विम्याच्या प्रीमियमवर 2.5* टक्के डिस्काउंट देण्यात येऊन प्रतिबंधात्मक लसीकरणाला कंपनीने प्रोत्साहन दिले होते (नवीन पॉलिसी आणि रिन्यूअल). ज्यांनी कोव्हिड-१९ ची लस किंवा बूस्टर शॉट किंवा ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस किंवा न्यूमोकोकल लस घेतली आहे, त्यांना हा डिस्काउंट देण्यात आला होता.

अतिरिक्त लाभ

रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीवर अमर्यादित लाभ मिळतात. यात अंदाजे ५ कोटींपर्यंत विमा संरक्षण, मोअरग्लोबल कव्हर, प्रसूती विमा संरक्षण, ओपीडी विमा संरक्षण, विम्याच्या रकमेच्या अमर्यादित प्रमाणात पुनःस्थापना (रिस्टोरेशन) आणि पंधराहून अधिक अतिरिक्त लाभ मिळतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग