मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank Holidays in October : ऑक्टोबरमध्ये बँकांना इतके दिवस सुट्टी, यादी पाहा अन् पटापट नियोजन करा!

Bank Holidays in October : ऑक्टोबरमध्ये बँकांना इतके दिवस सुट्टी, यादी पाहा अन् पटापट नियोजन करा!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 27, 2023 03:18 PM IST

October Bank Holidays list : ऑक्टोबर महिना सुरू व्हायला अवघे काहीच दिवस उरले आहेत. या वर्षी आँक्टोबरमध्ये सणांची भरघोस लिस्टच आहे. त्यामुळे किमान १८ दिवस बँकांना सुट्टी असेल. जर बँकांसंदर्भात तुमची काही कामं असतील तर, पटापट नियोजन आत्ताच करा.

bank holidays list in october 2023 HT
bank holidays list in october 2023 HT

Bank Holidays in October : सप्टेंबरचा महिना संपत आहे आणि आँक्टोबर लवकरच सुरू होत आहे. या महिन्यात दसरा दिवाळीसारखे मोठ्या सणांचं सेलिब्रेशन होणार आहे. त्यामुळे या बाबींकडे लक्ष देत तुमची बँकांची अनेक आर्थिक कामे प्रलंबित राहू शकतात. आँक्टोबरमध्ये बँकांना हक्काच्या भरपूर सुट्ट्या आहेत. (Holidays in October 2023) आँक्टोबर महिन्याची सुरूवातच १ तारखेला रविवारपासून होत आहे.त्यामुळे साप्ताहिक सुट्टया आणि सणांच्या सुट्टया मिळून तब्बल १८ दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे सुट्ट्यांची यादी पाहा आणि आत्ताच आपल्या कामांचे नियोजन करावं लागणार आहे.

या तारखांना बंद राहणार बँका

२ आँक्टोबर - गांधी जयंती

१४ आँक्टोबर (शनिवार) - महालया - कोलकातामध्ये बंद

१८ आँक्टोबर - (बुधवार) - कटि बिहू - आसाममध्ये बँका बंद

१ ऑक्टोबर शनिवार - दुर्गा पूजा (महा सप्तमी) - त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद.

२३ ऑक्टोबर (सोमवार) – दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजय दशमी – त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, जरकाखंड, बिहारमध्ये बँका बंद आहेत.

२४ ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा/दसरा (विजयादशमी)/दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद.

२५ ऑक्टोबर (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद.

२६ ऑक्टोबर (गुरुवार) - दुर्गा पूजा (दसैन) - सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद.

२७ ऑक्टोबर, (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद आहेत.

२८ ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा – बंगालमध्ये बँका बंद आहेत.

३१ ऑक्टोबर (मंगळवार)- सरदार वल्लभ भाई पटेल जयंती

WhatsApp channel

विभाग