Shani Vakri : जूनमध्ये बदलणार शनि आपली चाल, याचा कोणत्या राशींवर होणार अशुभ परिणाम?
Shani Vakri 2023 : शनिच्या या वक्री होण्याचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्या कमनशीबी राशी कोणत्या आहेत.
जून २०२३मध्ये शनि आपली चाल बदलणार आहे. शनि कुंभ राशीतून मागे जाणार आहे. शनिचं हे वक्री होणं काही राशींवर अशुभ परिणाम टाकणारं आहे. शनि १७ जून २०२३ रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास माघारी फिरणार आहे. शनिच्या या वक्री होण्याचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्या कमनशीबी राशी कोणत्या आहेत ते आपण पाहाणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींना या काळात नेहमीपेक्षा जास्त काम करावं लागेल. कामाचा ताण वाढल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणूनच आरोग्याच्या बाबत सतर्क राहाण्याचा सल्ला दिला जात आहे.
कर्क रास
कुंभ राशीत शनिची वक्री स्थिती तुमच्या राशीच्या आठव्या घरात येणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही खूप मेहनत कराल मात्र त्या मेहनतीचं फळ तुम्हाला कदाचित मिळणार नाही. याशिवाय कर्क राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना काळजी घ्यावी असा सल्ला दिला जात आहे.
तूळ रास
कुंभ राशीत शनि वक्री झाल्याने मानसिक दबाव तूळ राशीच्या व्यक्तींवर वाढताना पाहायला मिळेल. तुमच्या व्यावसायिक जीवनात आव्हानांचा डोंगर असू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकलावा. तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ रास
कुंभ राशीतच शनि वक्री होणार आहे. यानं मन:शांती हरवण्याची साफ शक्यता पाहायला मिळत आहे. कुंभ राशीच्या लोकांनी कोणत्याही क्षेत्रात घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. कारण यामुळे तुमच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनातही ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)