मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mankading:'वर्ल्डकप फायनलमध्ये रोहित शर्माविरुद्ध मांकडिंग केले तर कसे वाटेल?'

Mankading:'वर्ल्डकप फायनलमध्ये रोहित शर्माविरुद्ध मांकडिंग केले तर कसे वाटेल?'

Sep 26, 2022, 12:47 PM IST

    • Mankading Controversy: इंग्लंडचे दिग्गज खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडपासून ते मायकल वॉन यांनी मांकडिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही जण मांकडिंगच्या बाजूने तर काहीजण विरोधात मत व्यक्त करत आहेत.
rohit sharma

Mankading Controversy: इंग्लंडचे दिग्गज खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडपासून ते मायकल वॉन यांनी मांकडिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही जण मांकडिंगच्या बाजूने तर काहीजण विरोधात मत व्यक्त करत आहेत.

    • Mankading Controversy: इंग्लंडचे दिग्गज खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडपासून ते मायकल वॉन यांनी मांकडिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही जण मांकडिंगच्या बाजूने तर काहीजण विरोधात मत व्यक्त करत आहेत.

नुकतीच भारत आणि इंग्लंड महिला संघादरम्यान एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. मालिकेतील अंतिम सामन्यात दीप्ती शर्माने चार्ली डीनला मांकडिंगद्वारे बाद करून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने मालिका ३-० अशी खिशात घातली. यानंतर मांकडिंगवर तुफान चर्चा सुरु आहे. काही जण मांकडिंगच्या बाजूने तर काहीजण विरोधात मत व्यक्त करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

विशेषतः इंग्लंडचे दिग्गज खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडपासून ते मायकल वॉन यांनी मांकडिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरनेही यावर भाष्य केले आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी तो सध्या भारतात आहे.

एका चॅनलवर बोतताना माँटी पानेसर दीप्ती शर्माच्या मांकडिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. तो म्हणाला की, 'हा नियम आहे. हे मान्य आहे, पण वर्ल्डकप फायनलमध्ये रोहित शर्माविरुद्ध एखाद्या संघाने असे केले तर कसे वाटेल? याचाही विचार व्हायला हवा".

दरम्यान, यापूर्वीच आयसीसीने खेळाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये मांकडिंगला अनफेअर-प्लेमधून काढून रनआऊटच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

मॉन्टी स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही.

गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी फलंदाजाने क्रीजमधून बाहेर पडावे की नाही, असा प्रश्न मॉन्टीला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर मॉन्टी गोंधळला. त्याला या प्रश्नाचे सखोल उत्तर देता आले नाही. तो म्हणाला की, “सामना कसा जिंकायचा हे त्या संघावर अवलंबून आहे”.

म्हणजेच, मॉन्टी एकीकडे मांकडिंगवर प्रश्नचिन्हही उपस्थित करत आहे आणि मांकडिंग करायचे की नाही हा निर्णय त्या संघावर सोडत आहे. मॉन्टी स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही.

दरम्यान, भारतीय खेळाडू विनू मांकड यांच्या नावावरून या नियमाला मांकडिंग हे नाव देण्यात आले. डावखुरा फिरकीपटू मंकडने १९४७-४८ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊनला अशा पद्धतीने बाद केले होते.

पुढील बातम्या