मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Duleep Trophy Final: कर्णधार रहाणेनं यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढलं, दोघांमधला प्रसंग व्हायरल

Duleep Trophy Final: कर्णधार रहाणेनं यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढलं, दोघांमधला प्रसंग व्हायरल

Sep 25, 2022, 02:39 PM IST

    • Yashasvi Jaiswal and ajinkya rahane Duleep Trophy: पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याचा सहकारी यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढल्याची विचित्र घटना घडली. रहाणेला हा निर्णय पंचाच्या सांगण्यावरून घ्यावा लागला.
Duleep Trophy

Yashasvi Jaiswal and ajinkya rahane Duleep Trophy: पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याचा सहकारी यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढल्याची विचित्र घटना घडली. रहाणेला हा निर्णय पंचाच्या सांगण्यावरून घ्यावा लागला.

    • Yashasvi Jaiswal and ajinkya rahane Duleep Trophy: पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याचा सहकारी यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढल्याची विचित्र घटना घडली. रहाणेला हा निर्णय पंचाच्या सांगण्यावरून घ्यावा लागला.

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा २९४ धावांनी पराभव केला. ५२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पश्चिम विभागाचा संघ २३४ धावांवर गारद झाला. हा सामना कोईम्बतूर येथे खेळला गेला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान या सामन्यादरम्यान पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याचा सहकारी यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढल्याची विचित्र घटना घडली. रहाणेला हा निर्णय पंचाच्या सांगण्यावरून घ्यावा लागला.

मैदानातील वाईट वागणूकीमुळे यशस्वीला मैदानाबाहेर काढल्याचे सांगण्यात येत आहे. सामन्यादरम्यान दक्षिण विभागाचा फलंदाज रवी तेजा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात बाचाबाची झाली. त्यासाठी यशस्वीला २-३ वेळा समज देण्यात आली. मात्र, या इशाऱ्यानंतरही जैस्वाल थांबला नाही, त्याने रवी तेजाविरुद्ध स्लेजिंग सुरुच ठेवली. त्यामुळे शेवटी कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले.

दरम्यान, अंतिम सामन्यात यशस्वी जैस्वालच्या २६५ धावांच्या शानदार खेळीमुळे पश्चिम विभागाने २९४ धावांनी मोठा विजय मिळवला. पश्चिम विभागाने १९ व्यांदा दुलीप ट्रॉफी जिंकली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणेच्या संघाने पहिल्या डावात २७० धावा केल्या होत्या. यादरम्यान हेत पटेलने ९८ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर बाबा इंद्रजीतोच्या शतकाच्या जोरावर दक्षिण विभागाने पहिल्या ३२७ धावा करत ६२ धावांची आघाडी घेतली.

तर दुसऱ्या डावात पश्चिम विभागाने यशस्वीचे द्विशतक आणि सर्फराज खानच्या शतकाच्या जोरावर ५८५ धावा केल्या. विजेतेपदासाठी ५२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण विभागाचा संघ २३४ धावांत गारद झाला.

पुढील बातम्या