मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jos Buttler Birthday: इंग्लंड क्रिकेटचं रुपडं पालटणारा जोस बटलर… जो द्रविड-गांगुलीमुळं घडला

Jos Buttler Birthday: इंग्लंड क्रिकेटचं रुपडं पालटणारा जोस बटलर… जो द्रविड-गांगुलीमुळं घडला

Sep 08, 2022 12:37 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Happy Birthday Jos Buttler: गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत: २०१५ नंतर क्रिकेटमध्ये बराच बदल झाला आहे. ५० षटकांत ३५० किंवा २० षटकात २०० धावा करणे किंवा त्या सहज चेस करणे हे आता सोपे वाटायला लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जोस बटलर, रोहित शर्मा, अॅरोन फिंच, मार्टिन गुप्टील यांच्यासारखे फलंदाज प्रत्येक संघात उपबल्ध आहेत. या खेळाडूंनी क्रिकेट खेळण्याचा अंदाजच बदलून टाकला आहे. असाच एक फलंदाज म्हणजे, जोस बटलर. ज्याने इंग्लंड क्रिकेटचा चेहरा बदलून टाकला आहे. इंग्लंडचा सध्याचा कर्णधार जोस बटलरचा आज वाढदिवस. बटलर आज वयाची ३१ वर्षे पूर्ण करत आहे.

इंग्लंडचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरचा जन्म ८ सप्टेंबर १९९० रोजी झाला. ३२ वर्षीय बटलर हा इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. तो कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा सर्व फॉरमॅटमध्ये खेळतो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

समरसेटकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या बटलरने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बटलरने २०१४ मध्ये साउथम्प्टनमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात बटलरने ८५ धावांची शानदार खेळी केली. बटलरने टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरलाही भारताविरुद्धच सुरुवात केली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

बटलरने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना संघाला अनेकदा विजय मिळवून दिले आहेत. याच कारणामुळे बटलरची तुलना एमएस धोनीशी केली जाते. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जस्टिन लँगरने बटलर हा जागतिक क्रिकेटचा नवा धोनी असल्याचे म्हटले होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

 जोस बटलर इंग्लंडच्या २०१९ मधील वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा महत्वाचा भाग होता. इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात बटलरचा सिंहाचा वाटा राहिला आहे. बटलरला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्यामुळेच तो सामने पाहण्यासाठी मैदानात जात असे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

द्रविड-गांगुलीच्या त्या इंनिंगचा बटलरवर प्रभाव- १९९९ मध्ये, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या विकेटसाठी ३१८ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. तेव्हा जोस बटलर त्या सामन्याचा साक्षीदार होता. हा सामना टॉंटनमध्ये खेळला गेला, तेव्हा ९ वर्षांचा जोस बटलर प्रेक्षकांमध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत होता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

त्या सामन्यात द्रविड-गांगुलीने त्या काळातील अव्वल गोलंदाज मुथैय्या मुरलीधरनची चांगलीच धुलाई केली होती. द्रविड-गांगुलीने मुरलीधरनची ज्या प्रकारे धुलाई केली होती, त्यावर बटलरच विश्वासच बसत नव्हता. द्रविड-गांगुलीची फलंदाजी पाहूनच बटरलने आक्रमक फलंदाज बनण्याचे ठरवले.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

बटलरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने ५७ कसोटी सामन्यांमध्ये ३१.९५ च्या सरासरीने २९०७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

तसेच, १५७ वनडे सामन्यांमध्ये बटलरने ४०.४३ च्या सरासरीने ४२४५ धावा केल्या आहेत. वनडेत बटलरने १० शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

तर ९४ टी-२० सामन्यांमध्ये जोस बटलरने २२२७ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि १८ अर्धशतके आहेत.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

Jos Buttler
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

Jos Buttler(all photos- Jos Buttler- instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज