मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Deepti Sharma: दिप्तीनं इंग्लिश फलंदाजांना रडवलं, त्या ४४व्या षटकांत नेमकं काय घडलं? पाहाच!

Deepti Sharma: दिप्तीनं इंग्लिश फलंदाजांना रडवलं, त्या ४४व्या षटकांत नेमकं काय घडलं? पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 25, 2022 10:51 AM IST

भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाला ३-० अशी धुळ चारली. तिसऱ्या सामन्यात भारताची दिग्गज ऑलराऊंडर दिप्ती शर्माने इंग्लंडची फलंदाज शार्ली डीनला मांकडिंगद्वारे धावबाद केले. यानंतर यावर बरीच चर्चा रंगली आहे.

Deepti Sharma
Deepti Sharma

भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा १६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाला ३-० अशी धुळ चारली. मात्र, या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सांपला नाटकीय अंदाजात संपला. त्यामुळे सामन्याची बरीच चर्चा रंगली आहे.

इंग्लंडच्या डावाच्या ४४ व्या षटकात एक प्रसंग घडला. हे षटक भारताची दिग्गज ऑलराऊंडर दिप्ती शर्मा टाकत होती. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी अजून १६ धावा करायच्या होत्या. शार्ली डीन ही शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. नॉन स्ट्रायकरच्या एंडला उभी असलेली डीन त्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर पडली. त्यामुळे दीप्तीने चाणाक्षपणा दाखवत बेल्स उडवल्या.

त्यानंतर भारतीय खेळाडूंनी धावबाद (मांकडिंग) साठी अपील केले. यावेळी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. रिप्लेत डीनने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी डीनला धावबाद घोषित केले. धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष सुरू केला . तर इंग्लिश खेळाडू यामुळे प्रंचड नाराज दिसले. डीन आणि फ्रेया डेव्हिस यांच्या डोळ्यात अश्रूही आले होते.

मांकडिंग नियम काय सांगतो?

नियमामुसाक, गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाला क्रीझमधून बाहेर येता येत नाही. गोलंदाजाच्या हे लक्षात आले आणि त्याने चेंडूने बेल्स उडवल्या तर त्याला मांकडिंग नियामाद्वारे फलंदाज रनआऊट घोषित करण्यात येतो.

हरमनप्रीत काय म्हणाली?

याबाबत कॅप्टन हरमनप्रीत कौरला विाचरण्यात आले. हरमनप्रीत म्हणाली, 'हा खेळाचा भाग आहे, मला वाटत नाही की आम्ही काही चुकीचे केले आहे. फलंदाज काय करत आहे याविषयी तुम्ही कितीज जागरूक आहात हे दर्शवते. मी माझ्या खेळाडूंना पाठिंबा देईन, तिने नियमाबाहेर काहीही केलेले नाही.

अश्विनने बटलरला या पद्धतीने बाद केले होते

आयपीएल २०१९ मध्ये रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरला मांकडिंग द्वारे बाद केले होते. यानंतर खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या विकेटनंतर तो सामना पूर्णपणे फिरला होता. आता अश्विन आणि बटलर मित्र बनले आहेत आणि दोघेही आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी (RR) एकत्र क्रिकेट खेळले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या