मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Traffic News : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल! अशी असेल वाहतूक व्यवस्था

Pune Traffic News : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल! अशी असेल वाहतूक व्यवस्था

Apr 14, 2024, 06:45 AM IST

    • Pune Traffic News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. हे बदल लक्षात घेऊन घराबाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल! अशी असेल वाहतूक व्यवस्था

Pune Traffic News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. हे बदल लक्षात घेऊन घराबाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    • Pune Traffic News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. हे बदल लक्षात घेऊन घराबाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Traffic News : पुण्यात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामुळे येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. येथील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी होत असते. येथे होणारी गर्दी पाहता आज सकाळी ६ सून रात्री गर्दी ओसरेपर्यंत पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे.

Pune Junnar murder : एकतर्फी प्रेमातून जुन्नरमधील महिलेनं तरुणाला गाडीखाली चिरडून मारलं! व्हिडिओ व्हायरल

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर

शाहिर अमर शेख चौक शाहिर अमर शेख चौकाकडून मालचक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहिर अमर शेख चौकातून वळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग शाहिर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक जहांगीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

जीपीओ चौक जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग जीपीओ चौकातून बोल्हाई, मालधक्का बौकाकडे जाणारी बाहतूक किराड चौक नेहरू मेमोरियल चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.

पुणे स्टेशन चौक पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतुक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग पुणे स्टेशन अलंकार चौक मार्गे इच्छितस्थळी नरपतगिरी चौक नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून चळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग नरपतगिरी चौक १५ ऑगस्ट चौक कमला नेहरू हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभारवेस चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. बॅनर्जी चौक बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतुक बैनर्जी चौकातून चळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जातील. ससुन हॉस्पीटल येथील अत्यावश्यक रुग्णांसाठी मार्ग ससून हॉस्पीटल येथील डेड हाऊस शेजारील गेटने प्रवेश देण्यात येत आहे.

Pimpri-chinchwad crime : पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणारी महिलांची टोळीचा पर्दाफाश; ६ महिला गजाआड

पार्किंग व्यवस्थेबाबत

मालधक्का चौक ते बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन, बोल्हाई चौक ते साधु वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जी.पी.ओ., बोल्हाई चौक ते नरपतगीर चौक, फोटोझिंको प्रेस उपरस्ता व बोल्हाई चौक ते डॉ बॅनर्जी चौक या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेखेरीज सर्व प्रकारची वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करावयास येणा-या भाविकांच्या वाहनांकरीता आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने), पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी वाहने), व ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून भावीकांनी आपली वाहने सदर पार्किंगचे ठिकाणीच पार्क करुन प्रशासनास सहकार्य करावे.

Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर प्रचारा दरम्यान दगडफेक, डोळ्याला दगड लागल्याने जगन मोहन रेड्डी जखमी

अरोरा टॉवर परिसर

डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक डॉ. कोयाजी रोड वरुन (सिल्व्हर जुबली मोटर्स) नेहरू चौकाकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे वळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक एस.बी.आय. हाऊस चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.

ईस्कॉन मंदिर चौक ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक ईस्कॉन मंदिर चौकातून वळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक एस.बी.आय. हाऊस चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. नेहरु चौक आहे. नेहरु चौकाकडुन तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतुक नेहरु चौकातून वळविण्यात आली आहे. पर्यायी मार्ग इच्छितस्थळी नेहरु चौकातून किराड चौक ब्ल्यु नाईल चौक एस.बी.आय. हाऊस मार्गे जावे. नाझ चौक महात्मा गांधी रोडवरुन नाझ चौकातून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक नाझ चौकातून वळविण्यात येत आहे. नाझ चौक महात्मा गांधी रोडवरुन नाझ चौकातून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक नाझ चौकातून वळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग नाझ चौक डावीकडे वळून बाटलीवाला बगीचा मार्गे इच्छितस्थळी जावे.

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपने तुमच्या मोबाईल नंबरवर बंदी घातली? पुन्हा कसे सुरू करायचे? जाणून घ्या पद्धत

पार्किंग व्यवस्थेबाबत

दोराबजी चौक ते अरोरा टॉवर ते तीन तोफा चौक व अरोरा टॉवर ते नाझ चौक, तारापोर रोड जंक्शन या रस्त्यांवर सर्व प्रकारचे वाहनांकरीता नो पार्किंग करण्यात येत आहे. अरोरा टॉवर चौकातील डॉ. आंबेडकर यांचे पुतळयास अभिवादन करण्यासाठी येणा-या भाविकांनी आपली वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट व अन्य रस्त्यांवरील पे-अॅण्ड पार्कच्या ठिकाणी पार्क करावीत.

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकापासून जिल्हाधकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक शाहीर अमर शेख चैाकातून वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चौकातून इच्छितस्थळी जावे. मुख्य टपाल कार्यालय परिसरातून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नेहरु मेमोरिअल हॉल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. पुणे स्टेशनकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी अलंकार चित्रपटगृह चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. रास्ता पेठेतील बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी नरपरतिगी चौक, पंधरा ऑगस्ट चौक, कमला नेहरु चौक, पवळे चौक, कुंभारवेस चैाकातून इच्छितस्थळी जावे.

ससून रुग्णालयात जाणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश

ससून रुग्णालयात जाणारे रुग्ण, तसेच रुग्णवाहिकांसाठी शवागाराजवळील (डेड हाऊस) प्रवेशद्वाराने प्रवेश देण्यात येणार आहे. अन्य वाहनांना या मार्गाचा वापर करता येणार नाही. एसएसपीएमएस मैदान (दुचाकी आणि चारचाकी वाहने), पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी आणि चारचाकी वाहने), ससून क्वार्टर्स (दुचाकी ) येथे वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दांडेकर पूल परिसरात वाहतूक बदल

दांडेकर पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे येथील वाहतुकी देखील मोठा बदल करण्यात आला आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. येथून जाणाऱ्या वाहनचालकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, सणस मैदान रस्ता, ना. सी. फडके रस्ता, मांगीरबाबा चौक, सेनादत्त चैाकी, दत्तवाडी परिसरातून सिंहगड रस्त्याकडे जावे. तर सिंहगड रस्त्यावरुन स्वारगेटकडे येणाऱ्या वाहनांनी गणेशमळा परिसरातील हॉटेल आशा, दत्तवाडी, सेनादत्त चौकीमार्गे, मांगीरबाबा चौकातून वळून ना. सी. फडके सभागृहमार्गे स्वारगेटकडे जावे. शास्त्री रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी मांगीरबाबा चौकातून डावीकडे वळून ना. सी. फडके चैाकमार्गे स्वारगेटकडे जावे.

लष्कर, विश्रांतवाडी भागात वाहतूक बदल

लष्कर भागातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी तारापोर रस्ता, इस्ट स्ट्रीट परिसरात वाहने लावावीत. विश्रांतवाडीती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडीतून टिंगरेनगर, विमानतळाकडे जाणारी वाहतूक मनोरुग्णालय, येरवडा कारागृहमार्गे वळविण्यात आली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या