Pimpri-chinchwad crime : पिंपरी- चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वाकड पोलिसांनी केला असून ६ महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलांमध्ये एक परिचारिकेचा समावेश असून ती या टोळीची प्रमुख असल्याची माहिती देखील तपसात पुढे आली आहे. सर्व आरोपी महिलांना १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी- चिंचवड शहरातील वाकड येथे नवजात बालकांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मागे मोठी टोळी असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. दरम्यान, या टोळीतील काही सदस्य हे काही बाळकांची विक्री करण्यासाठी जगताप डेअरी येथे येणार असल्याचे पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून कळले. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारावर वाकड पोलिसांनी सापळा रचला. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास काही महिला या दोन रिक्षातून जगताप डेअरी येथे आल्या. या महिलांकडे ७ दिवसांचे एक नवजात बालक होतं.
पोलिसांचा संशय बळावताच त्यांनी सहाही महिलांना अटक केली. पोलिसांनी नवजात बालका विषयी विचारल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाकड पोलिसांनी सहा महिलांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची कठोर चौकशी केली. यानंतर त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल करत या मुलाची विक्री करणार असल्याचे सांगितले.
महत्वाचे म्हणजे, म्हणजे याआधी आरोपी महिलांनी पाच नवजात बालकांची विक्री केल्याचे कबूल केले. सर्व आरोपी महिलांमध्ये एक महिला ही परिचारिका असून ती एका खाजगी रुग्णालयात काम करते. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या पालकांना हेरून त्यांना पैशाचं अमिश दाखवून नवजात बालक विकत घेऊन या बाळकांची विक्री ज्यांना मुले नाहीत अशा पालकांना मोठ्या रकमेळा ही टोळी विक्री करत होते. ६ ते ७ लाख रपयांना बाळाची विक्री केली जात असे. या टोळिमागे आणखी कुणाचा हात आहे का? त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.