मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Junnar murder : एकतर्फी प्रेमातून जुन्नरमधील महिलेनं तरुणाला गाडीखाली चिरडून मारलं! व्हिडिओ व्हायरल

Pune Junnar murder : एकतर्फी प्रेमातून जुन्नरमधील महिलेनं तरुणाला गाडीखाली चिरडून मारलं! व्हिडिओ व्हायरल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 14, 2024 06:32 AM IST

Pune Junnar murder : पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Pune Crime) तालुक्यात एकतर्फी प्रेमातून एका महिलेने एका तरुणाला गाडीखाली चीरडुन ठार मारले. ही घटना पुणे नाशिक मार्गावर नारायणगाव येथे घडली.

 एकतर्फी प्रेमातून जुन्नरमधील महिलेनं तरुणाला गाडीखाली चिरडून मारलं! व्हिडिओ व्हायरल
एकतर्फी प्रेमातून जुन्नरमधील महिलेनं तरुणाला गाडीखाली चिरडून मारलं! व्हिडिओ व्हायरल

Pune Junnar murder : पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना ताजी असतांना जुन्नर तालुक्यात एका महिलेने एकतर्फी प्रेमातून तरुणाला गाडीखाली चिरडून त्याची हत्या केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे घडली. या प्रकरणी आरोपी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

साबीर मोहम्मद शफी ब्यापारी (वय ४५, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी अभिजीत सोनवणे (वय २८, रा. डिंगोरे, ता. जुन्नर), जेबा इराफान फकीर (वय ३२, रा. पणसुंबा पेठ, ता. जुन्नर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर प्रचारा दरम्यान दगडफेक, डोळ्याला दगड लागल्याने जगन मोहन रेड्डी जखमी

दोघांचे एकमेकांवर प्रेम

पोलिसांनी दिलेल्या महतीनुसार साबीर आणि जेबा दोघे विवाहित आहेत. साबीर हा जेबावर एकतर्फी प्रेम करत होता. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. जेबा जुन्नर तालुक्यातील कांदळी ओैद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करत असून ती नोकरीनिमित्त जुन्नरहून कांदळी येथे जात होती. तर आरोपी अभिजीत हा जुन्नर तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करत असून जेबा आणि अभिजीतची प्रवासादरम्यान ओळख झाली. दरम्यान, दोघांमध्ये सूत जुळले. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. याची माहिती साबीरला मिळाली. यावरून अभिजीत व साबिर यांच्यात मोठे वाद देखील झाले होते. दरम्यान, गुरुवारी (दि ११) रमजाननिमित्त अभिजीत हा जेबाच्या घरी गेला. यावेळी साबीर व अभिजीतमध्ये वाद झाला.

जुन्नरमध्ये तानावाचे वातावरण

दरम्यान, शुक्रवारी सकाळी जेबा ही कामाला जात असतांना साबिरने तिचा पाठलाग केला. ही बाब जेबाने अभिजीतला सांगितली. दरम्यान, दुपारी २ च्या सुमाारास साबीर पुणे-नाशिक महामार्गावरील अयोध्या हॉटेल जवळ थांबला असतांना अभिजीत कार मधून आला. यावेळी अभिजीतने भरधाव वेगातील कार ही साबीरच्या अंगावर घातली. यात साबिर हा गाडीकाहलि आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे जुन्नर येथील पणसुंबा पेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. पोलिसांनी आरोपी अभिजीतसह जेबाला अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point