मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur Suicide case : सोलापूर हादरले! दोन मुलांसह आईने संपवलं जीवन; सरवदे नगरातील धक्कादायक घटना

Solapur Suicide case : सोलापूर हादरले! दोन मुलांसह आईने संपवलं जीवन; सरवदे नगरातील धक्कादायक घटना

Mar 04, 2024, 05:10 AM IST

    • Solapur Suicide case : सोलापूरच्या (Solapur News) सरवदे नगर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली.
दोन मुलांसह आईने संपवलं जीवन; सोलापूरच्या सरवदे नगरातील धक्कादायक घटना (HT)

Solapur Suicide case : सोलापूरच्या (Solapur News) सरवदे नगर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली.

    • Solapur Suicide case : सोलापूरच्या (Solapur News) सरवदे नगर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली.

Solapur Suicide case : सोलापूर येथील सरवदे नगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील मुळेगाव रोड येथील सरवदे नगरामध्ये एका आईने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Pune hadapsar Fire : हडपसरमध्ये ११ मजली सोसायटीतील फ्लॅटला भीषण आग; संसाराची झाली राख रांगोळी

स्नेहा संतोष चिल्लाळ (वय ३०) असे आईचे नाव आहे. तर, संध्या संतोष चिल्लाळ (वय ११), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय ७, सर्व रा. प्लॉट नं. ५, सरवदे नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) अशी मृत दोन मुलांची नावे आहेत. ही घटना आजू बाजूच्या नागरिकांना कळल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

lalu Yadav on Modi: पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत, तर नितीश..; INDIAच्या रॅलीत १५ लाख लोकांसमोर लालूंची जोरदार फटकेबाजी

पोलिसांनी घटनास्थळी येत सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले या बाबत अद्याप कळू शकले नाही. महिलेचे पती संतोष सरवदे यांनी पत्नीसह मुलांना मृत अवस्थेत पाहून टाहो फोडला. त्यांचा आवाज ऐकून आजूचाजूचे नागरिक जमले. यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

पोलीस हवालदार एस. एन. गायकवाड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिघांनाही लोकांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. आधी लेकरांना नंतर स्वतः गळफास घेऊन स्नेहा सरवदे यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या