lalu Yadav on Modi: पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत, तर नितीश..; INDIAच्या रॅलीत १५ लाख लोकांसमोर लालूंची जोरदार फटकेबाजी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  lalu Yadav on Modi: पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत, तर नितीश..; INDIAच्या रॅलीत १५ लाख लोकांसमोर लालूंची जोरदार फटकेबाजी

lalu Yadav on Modi: पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत, तर नितीश..; INDIAच्या रॅलीत १५ लाख लोकांसमोर लालूंची जोरदार फटकेबाजी

Mar 03, 2024 08:15 PM IST

Lalu Yadav on Narendra Modi : पाटण्यात आयोजित इंडिया आघाडीच्या सभेत लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर व्यक्तिगत हल्लाबोल करत ते हिंदू नसल्याचा दावा केला.

लालू प्रसाद यादवांचा मोदींवर हल्लाबोल
लालू प्रसाद यादवांचा मोदींवर हल्लाबोल

Bihar INDIA Alliance: इंडिया आघाडीत सामील घटक पक्षांची पाटण्यातील गांधी मैदानात भव्य जन विश्वास रॅली पार पडली. या रॅलीच्या माध्यमातून इंडियाने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या महारॅलीचे आयोजन राजदकडून करण्यात आले होते. यामध्ये राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, सीपीआय महासचिव डी राजा, सीपीआयएम महासचिव सीताराम येचुरी  यांनी रॅलीला संबोधित केले. राजदने दिलेल्या माहितीनुसार या रॅलीत जवळपास १५ लाखांची गर्दी होती.

नितीश पलटूराम -

जनविश्वास रॅलीत भाषण करताना लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लालू म्हणाले की, बिहार जो निर्णय घेतो, देशातील जनता त्याचे पालन करते. तेजस्वीने महाआघाडी सरकारच्या काळात लाखो नोकऱ्या दिल्या. नितीश कुमारांचे नाव न घेता म्हणाले की, ते जर पुन्हा इकडे यायचा विचार करतील तर मोठा धक्का मिळेल. २०१७ मध्ये नितीश कुमार महाआघाडीतून एनडीएमध्ये गेले, तेव्हा आम्ही त्यांना शिवीगाळ केली नव्हती. केवळ पलटूराम म्हटले होते. त्यानंतर आम्ही त्यांचा पुन्हा महाआघाडीत समावेश केला, तीच आमची मोठी चूक होती. आता ते पुन्हा पलटले.

पीएम मोदी हिंदू नाहीत -

लालू यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या धर्मावर भाष्य करत संदेश दिला की, पीएम मोदी आणि भाजपला बिहारमध्ये राजद काट्याची टक्कर देण्यास सज्ज आहे. लालू म्हणाले, 'हे मोदी मोदी काय आहे, मोदी काय वस्तू आहे का? नरेंद्र मोदी बिल्कुलही हिंदू नाहीत. जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले, आपल्याकडे परंपरा आहे की, मुलगा डोक्यावरील केस व दाढी काढतो. मोदींनी सांगावे त्यांनी केस व दाढी का काढली नाही? देशात केवळ द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. राम मंदिर आणि प्राण प्रतिष्ठेच्या गोष्टी करत आहेत. विना प्राण प्रतिष्ठेचे इतके दिवस देव बनून फिरत आहेत. 

मोदी म्हणाले होते की, सरकार आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील. आमचाही विश्वास होता की कदाचित येतील, त्यामुळेच सर्वांचे जन धन खाते उघडले, पण १५ लाख आले नाहीत. मोदींनी देशातील जनतेची फसवणूक केली

बिहारमध्ये राजा दशरथने प्रभू रामाचा विवाह केला. बिहारमध्ये एकापेक्षा एक वीर योद्धे जन्माला आले आहेत. बिहार जो निर्णय करतो, देश त्याचेच अनुसरण करेत.

लालू यादव यांनी आजच्या रॅलीतून दलित व मागास वर्ग तसेच आदिवासी व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. लालू म्हणाले आजच्या रॅलीतील गर्दी पाहून नितीश यांना आणखी आजार होणार.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर